राम कदम यांनी चलनी नोटांसाठी महापुरूषांचे दिले पर्याय! छत्रपतींचा फोटो मात्र अभिनेता शरद केळकरचा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्यासोबतच गणपती बाप्पा आणि लक्ष्मी यांचे फोटो असावेत अशी मागणी मोदी सरकारकडे केली आहे. यानंतर आता भाजपच्या आमदारांकडूनही नोटांवर फोटो लावण्यासाठी पर्याय सुचवले जात आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवरायांचा फोटो चलनी नोटांवर असावा अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार राम कदम […]
ADVERTISEMENT
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्यासोबतच गणपती बाप्पा आणि लक्ष्मी यांचे फोटो असावेत अशी मागणी मोदी सरकारकडे केली आहे. यानंतर आता भाजपच्या आमदारांकडूनही नोटांवर फोटो लावण्यासाठी पर्याय सुचवले जात आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवरायांचा फोटो चलनी नोटांवर असावा अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार राम कदम यांनी तर कोणत्या महापुरूषांचे फोटो नोटांवर असावेत त्याचे पर्यायच दिले आहेत.
ADVERTISEMENT
काय आहे राम कदम यांचं ट्विट?
अखंड भारत, नया भारत, महान भारत जय श्रीराम, जय मातादी! अशा ओळी लिहित राम कदम यांनी चलनी नोटांचे चार पर्याय दिले आहेत.
पहिल्या पर्यायावर छत्रपती शिवरायांच्या फोटोचा आहे.
हे वाचलं का?
दुसरा पर्याय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचा आहे
तिसरा पर्याय हा वीर सावरकर यांच्या फोटोचा आहे
ADVERTISEMENT
चौथा पर्याय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा आहे
ADVERTISEMENT
असे चार चलनी नोटांचे पर्याय ट्विट करत राम कदम यांनी ही मागणी केली आहे.
अखंड भारत.. नया भारत.. महान भारत..
जय श्रीराम .. जय मातादी ! pic.twitter.com/OPrNRu2psl
— Ram Kadam (@ramkadam) October 27, 2022
राम कदम यांनी ट्विट केलेल्या पर्यायावर छत्रपती शिवरायांचा फोटो प्रत्यक्षात शरद केळकरचा
अभिनेता शरद केळकरने तान्हाजी या हिंदी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या भूमिकेत शरद केळकर शोभूनही दिसला होता. त्याचं पोस्टरही व्हायरल झालं आणि भूमिकाही गाजली होती. राम कदम यांनी जो चलनी नोटेसाठी छत्रपती शिवरायांचा फोटो असावा अशी मागणी केली आहे तो फोटो प्रत्यक्षात छत्रपती शिवरायांच्या रूपात असलेल्या शरद केळकरचा आहे. शरद केळकरने तान्हाजी सिनेमात जी भूमिका केली होती त्याचं जे पोस्टर होतं तोच फोटो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून वापरण्यात आला आहे.
नितेश राणे यांनीही ट्विट केला चलनी नोटेचा फोटो ज्यावर आहेत छत्रपती शिवराय
भाजप आमदार नितेश राणे यांनी ये परफेक्ट है असं म्हणत छत्रपती शिवरायांचा फोटो असलेल्या दोनशे रूपयांच्या नोटेचा फोटो ट्विट केला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी हा फोटो ट्विट करत असताना कोणतीही चूक केलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या देशाचं अराध्य दैवत आहे त्यामुळे चलनी नोटांवर त्यांचा फोटो असावा अशी माझी इच्छा आहे त्यामुळे ही मागणी मी मोदी सरकारकडे करत आहे असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
Ye perfect hai ! ? pic.twitter.com/GH6EMkYeSN
— nitesh rane (@NiteshNRane) October 26, 2022
राम कदम यांनी नोटेच्या चौथ्या पर्यायावर मोदींच्या फोटो दिल्याने ट्रोलिंग
राम कदम यांनी नोटांसाठीचे जे चार पर्याय दिले आहेत त्यातल्या चौथ्या पर्यायावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. त्यावरून राम कदम ट्रोल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो का? राम कदम तुम्ही डोक्यावर पडला आहात का? या आशायचे रिप्लाय राम कदम यांना या ट्विटवर दिले जात आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT