‘…यासाठी माझ्या कुटुंबाने जीव दिलाय’; मोदींची हिटलरशी तुलना, RSS चा उल्लेख, राहुल गांधी काय म्हणाले?
महागाई, बेरोजगारीसह देशातील विविध मुद्द्यांवर काँग्रेसकडून देशभरात आंदोलन केलं जात असून, आंदोलनाला सुरूवात होण्यापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर प्रहार केला. आरएसएसच्या विचारधारेला विरोध करणं हे माझं कर्तव्य असून, मी तो करत राहिन, अशी भूमिका राहुल गांधी मांडली. यावेळी त्यांनी ईडीच्या कारवायांवर भाष्य केलं. राहुल गांधी काय म्हणाले? पत्रकार […]
ADVERTISEMENT

महागाई, बेरोजगारीसह देशातील विविध मुद्द्यांवर काँग्रेसकडून देशभरात आंदोलन केलं जात असून, आंदोलनाला सुरूवात होण्यापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर प्रहार केला. आरएसएसच्या विचारधारेला विरोध करणं हे माझं कर्तव्य असून, मी तो करत राहिन, अशी भूमिका राहुल गांधी मांडली. यावेळी त्यांनी ईडीच्या कारवायांवर भाष्य केलं.
राहुल गांधी काय म्हणाले?
पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, “लोकांच्या मुद्द्यांवर मी जितका आवाज उठवेन, तितके माझ्यावर हल्ले होतील. मी महागाई, बेरोजगारी हे मुद्द्यांवर बोलेन तितके हल्ले माझ्यावर होतील. जो धमकावत आहे, तो घाबरतो. देशात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला ते घाबरत आहे. त्यांनी लोकांना आश्वासनं दिली होती, पण पूर्ण केली नाहीत, त्यामुळे ते घाबरत आहे. महागाईला घाबरतात, बेरोजगारीला घाबरतात. जनतेच्या शक्तीला घाबरतात, कारण खोटं बोलतात. २४ तास हे लोक खोटं बोलत असतात. महागाई नाही, बेरोजगारी नाहीये, चीनने घुसखोरी केलेली नाही असं खोटं बोलतात.
राजकीय पक्षांना घाबरण्याचे प्रयत्न होत आहे, तेच आता काँग्रेससोबत आणि सोनिया गांधींसोबत होत आहे. त्याचा सामना कसा करणार? असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी म्हणाले, “कसलीच भीती नाहीये. सामना करण्याचा प्रश्नच नाही. कुणाला घाबरायचं आहे.”
ईडी अधिकाऱ्यांना जाऊन विचारा- राहुल गांधी
“जितके मी लोकांचे मुद्दे उचलून धरेन, तितके माझ्यावर हल्ले होतील. अशा राजकीय हल्ल्यांमधून शिकतो. मला त्याचा फायदा. राजकीय विरोधक जेव्हा असे हल्ले करतात, तेव्हा मला आनंद होतो. कारण मला माझी विचाराधारा आणखी समजते. ज्या ईडी अधिकाऱ्यांनी माझी चौकशी केलीये. त्यांना जाऊन विचारा, त्या खोलीत काय झालं हे ते तुम्हाला सांगतील,” असं राहुल गांधी म्हणाले.