भारत जोडो यात्रा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर; 14 दिवस मुक्काम, ठाकरे – पवार सहभागी होणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बैठक घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील संपूर्ण नियोजनाची माहिती दिली.

ADVERTISEMENT

बाळासाहेब थोरात म्हणाले, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून या यात्रेची सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात ३८१ किलोमिटर ते पायी चालणार आहेत. एकूण 14 दिवसांचा त्यांचा महाराष्ट्रात मुक्काम असणार आहे. नांदेड आणि शेगाव येथे त्यांच्या दोन सभा महाराष्ट्रात होणार आहेत.

पवार-ठाकरे सहभागी होणार?

यावेळी राहुल गांधी यांच्या पदयात्रेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यात्रेत सहभागी होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, भारत जोडो पद यात्रेत येण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख मंडळींना निमंत्रण दिलं आहे. ते पायी चालणार नाहीत, मात्र यात्रेत त्यांचा सहभाग निश्चित दिसणार आहे.

हे वाचलं का?

७ नोव्हेंबर दरम्यान ही यात्रा सुरु होणार असून आम्ही त्यांना तारीख सांगितली आहे. मात्र ते कुठं येऊन यात्रेत सहभागी होणार हे निश्चित नाही. परंतु, उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, इतर नेते, शरद पवार यात्रेत सहभागी झालेले तुम्हाला दिसतील आणि ते निश्चित येणारं असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT