सोन्याची बांगडी, भांडी, कौलं…रायगडावरील उत्खननात सापडला अमूल्य ठेवा

मुंबई तक

रायगड प्राधिकरणातर्फे रायगड किल्ल्यावर सुरु असलेल्या उत्खननात शुक्रवारी अनेक महत्वाच्या व मौल्यवान वस्तू हातात आल्या आहेत. प्राधिकरणामार्फत किल्ल्यावर सुरु असलेल्या उत्खननात भांडी, नाणी, घराची विविध प्रकारची कौलं, सोन्याची बांगडी असा मौल्यवान ठेवा समोर आला आहे. रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली. उत्खननात गडावर सापडलेल्या मौल्यवान वस्तूंमुळे मराठा साम्राज्य […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

रायगड प्राधिकरणातर्फे रायगड किल्ल्यावर सुरु असलेल्या उत्खननात शुक्रवारी अनेक महत्वाच्या व मौल्यवान वस्तू हातात आल्या आहेत. प्राधिकरणामार्फत किल्ल्यावर सुरु असलेल्या उत्खननात भांडी, नाणी, घराची विविध प्रकारची कौलं, सोन्याची बांगडी असा मौल्यवान ठेवा समोर आला आहे. रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली.

उत्खननात गडावर सापडलेल्या मौल्यवान वस्तूंमुळे मराठा साम्राज्य असताना गडावरील लोकांचं त्याकाळचं राहणीमान, संस्कृती, घरांच्या रचना नव्याने समजण्यास मदत होणार आहे. ज्या ठिकाणाहून अशा वस्तू मिळत आहेत त्या जागेचं महत्व आणि माहिती अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होणार असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं.

रायगड किल्ल्यावर उत्खनन करत असताना छोट्या-मोठ्या ३०० जागा निश्चीत करण्यात आल्या होत्या. पुरातत्व खात्याच्या माध्यमातून सध्या ज्या पद्धतीने गडावर उत्खनन सुरु आहे ते पाहता पुढील सर्व जागांवर उत्खनन होण्यासाठी किमान पुढील २५ वर्षांचा कालावधी जाईल. यासाठी रायगड प्राधिकरणामार्फत पुरातत्व खात्याकडे उत्खननासाठी परवानगी मागण्यात आलेली आहे असंही संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं. याचसोबत उत्खननाचं काम सुरु असताना व्हिडीओ रेकॉर्डिंग करणं गरजेचं असल्याचंही संभाजीराजे म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp