Railway प्रवाशांची RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणं अनिवार्य, महाराष्ट्र सरकारने जारी केली रेल्वेसाठी नवी नियमावली
मुंबई: कोरोनाची (Corona) वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Govt) लांब पल्ल्याच्या आणि परराज्यातून रेल्वेने (Railway) (लोकल ट्रेन वगळता) येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली (New Guidelines) तयार केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) या संबंधीची गाइडलाइन आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांना या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. सगळ्यात […]
ADVERTISEMENT
मुंबई: कोरोनाची (Corona) वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Govt) लांब पल्ल्याच्या आणि परराज्यातून रेल्वेने (Railway) (लोकल ट्रेन वगळता) येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली (New Guidelines) तयार केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) या संबंधीची गाइडलाइन आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांना या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे.
ADVERTISEMENT
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्टात येणाऱ्या प्रवाशांकडे 48 तास आधी करण्यात आलेल्या RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असणं गरजेचं आहे.
राज्य सरकारने रेल्वे प्रवाशांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीतील काही महत्त्वाचे मुद्दे:
हे वाचलं का?
-
सर्व प्रवाशांना संपूर्ण प्रवासात आणि रेल्वे स्थानकात मास्क घालणं अनिवार्य असणार आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरेजचं आहे.
ADVERTISEMENT
सर्व स्थानकांवरील प्रवेश / निर्गमनाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनर असणं गरजेचं आहे.
ADVERTISEMENT
प्रवाशांनी ट्रेन सुटण्याच्या वेळेपूर्वी स्टेशनवर यावं. जेणेकरून एन्ट्री पॉइंट्सवर थर्मल स्कॅनिंगसाठी गर्दी होणार नाही.
ई-तिकिट/मोबाइल तिकिट याचं अधिकाधिक प्रमोशन करणं गरजेचं आहे. कारण मोबाइल नंबरमुळे एखाद्या प्रवाशाचं ट्रेसिंग करणं सोपं जाईल.
महाराष्टात येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे 48 तास आधी करण्यात आलेल्या RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असणं गरजेचं आहे.
Maharashtra Lockdown: महाराष्ट्राची वाटचाल संपूर्ण लॉकडाऊनच्या दिशेने, अनेक जिल्ह्यात कठोर निर्बंध
परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची माहिती जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देणं बंधनकारक असणार आहे.
-
संवेदनशील भागातून येणाऱ्या प्रवाशांना आरक्षित तिकिटाशिवाय महाराष्ट्रात प्रवासाला परवानगी नसेल
-
प्रत्येक प्रवाशाची यावेळी तपासणी केली जाईल. आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असणाऱ्यांची सुद्धा चाचणी केली जाईल. किमान थर्मल स्क्रिनिंग तरी केलंच जाईल.
-
दरम्यान, ट्रेनने महाराष्ट्रात आलेल्या प्रवाशांच्या हातावर होम क्वॉरंटाइनचा शिक्का मारण्यात यावा. ज्यांना पुढचे १५ दिवस घराबाहेर पडता येणार नाही. आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह रिपोर्ट असणाऱ्या आणि स्टेशनवर अँटजेन घेतलेल्या प्रवाश्यांसाठी देखील हा नियम लागू असणार आहे.
-
जर हातावर होम क्वारंटाईन असा शिक्का असलेला व्यक्ती त्या 15 दिवसांमध्ये बाहेर फिरताना आढळून आला तर त्याला 1000 रुपये दंड ठोठावण्यात येईल. तसंच त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविण्यात येईल.
-
रेल्वेने या ट्रेनमध्ये असणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांची देखील अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.
-
याशिवाय महाराष्ट्रातील जे नागरिक परराज्यात प्रवास करणार आहेत त्यांना सुद्धा या सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे.
Maharashtra Lockdown: महाराष्ट्राची वाटचाल संपूर्ण लॉकडाऊनच्या दिशेने, अनेक जिल्ह्यात कठोर निर्बंध
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या 24 तासात तब्बल 68,331 नवे रुग्ण सापडले होते. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. याशिवाय आणखी चिंताजनक गोष्ट म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृतांचा आकडा (Corona Deaths) देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कारण काल (18 एप्रिल) एका दिवसाता महाराष्ट्रात तब्बल 503 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर 6 लाख 70 हजार 388 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
या सगळ्या परिस्थितीचा विचार करुनच राज्य सरकारने आता परराज्यातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी कठोर अशी नियमावली जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT