Video : वसईत दोन हजाराच्या नोटांचा पाऊस? नोटा गोळा करायला स्थानिकांची रस्त्यावर गर्दी
मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वसई भागात रविवारी संध्याकाळी एक विचीत्र घटना पहायला मिळाली. वसईच्या मधूबन परिसरात भरचौकात दोन हजाराच्या नोटांचा खच पडलेला पहायला मिळाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी इकडे गर्दी केली. परंतू ज्यावेळेला सत्य समोर आलं तेव्हा सर्वांचा हिरमोड झाला. वसईच्या मधूबन भागात रस्त्यावर दोन हजाराच्या नोटांचा खच पडल्याची बातमी कळताच अनेक नागरिक, […]
ADVERTISEMENT
मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वसई भागात रविवारी संध्याकाळी एक विचीत्र घटना पहायला मिळाली. वसईच्या मधूबन परिसरात भरचौकात दोन हजाराच्या नोटांचा खच पडलेला पहायला मिळाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी इकडे गर्दी केली. परंतू ज्यावेळेला सत्य समोर आलं तेव्हा सर्वांचा हिरमोड झाला.
ADVERTISEMENT
वसईच्या मधूबन भागात रस्त्यावर दोन हजाराच्या नोटांचा खच पडल्याची बातमी कळताच अनेक नागरिक, लहान मुलं रस्त्यावर आली होती. अनेकांनी तर नोटा उचलल्यादेखील…पण ज्यावेळी या नोटा खोट्या असल्याचं कळलं तेव्हा सर्वांचाच हिरमोड झाला. एका वेबसिरीजच्या शुटींगसाठी या बनावट नोटा वापरण्यात आल्या होत्या.
वसईच्या मधूबन परिसरात रविवारी संध्याकाळी दोन हजारांच्या नोटांचा खच पडलेला पहायला मिळाला. याबद्दल माहिती कळताच स्थानिक नागरिकांची इथे गर्दी जमली. परंतू या नोटा खोट्या असल्याचं कळताच सर्वांचा हिरमोड झाला. #ViralVideo pic.twitter.com/NB25DKZKmG
— Mumbai Tak (@mumbaitak) October 4, 2021
या मार्गाने प्रवास करणाऱ्या काही वाहनचालकांनीही गाडी रस्त्यात थांबवून या नोटा गोळा करण्याचा प्रयत्न केला. परंतू यामागची खरी कहाणी समजल्यानंतर त्यांनीही तिकडून काढता पाय घेतला. दिवसभर वसईमध्ये या नोटांच्या पावसाची चर्चा मात्र चांगलीच रंगली होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT