राज ठाकरेंच्या भाषणातलं ‘हेच ते’ वक्तव्य ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हा झाला दाखल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा घेतली. या सभेची चर्चा आणि त्यावर उमटणारे पडसाद अजूनही संपलेले नाहीत. राज ठाकरेंवर प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. राज ठाकरे यांनी जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी शरद पवारांवर कडाडून टीका केली. शरद पवार जातीयवादी असल्याचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीयवाद वाढल्याचंही ते […]
ADVERTISEMENT
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा घेतली. या सभेची चर्चा आणि त्यावर उमटणारे पडसाद अजूनही संपलेले नाहीत. राज ठाकरेंवर प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. राज ठाकरे यांनी जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी शरद पवारांवर कडाडून टीका केली. शरद पवार जातीयवादी असल्याचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीयवाद वाढल्याचंही ते म्हणाले.
ADVERTISEMENT
राज ठाकरेंच्या भाषणाच्या वेळी अजान सुरू झाली होती. त्यावेळी त्यांनी जे वक्तव्य केलं त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. नेमकं हे वक्तव्य काय होतं? ते आपण जाणून घेऊ.
हे वाचलं का?
राज ठाकरे म्हणाले 4 तारखेनंतर ऐकणार नाही, अन् मुस्लिम पदाधिकार्यांचे राजीनामा झाले सुरु
राज ठाकरेंच्या कोणत्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला?
ADVERTISEMENT
“माझी पोलिसांना नम्र विनंती आहे. सभेच्या वेळेला बांग सुरू करणार असतील तर आत्ताच्या आत्ता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा. यांना जर सहज सरळ मार्गाने समजत नसेल तर त्यानंतर महाराष्ट्रात काय होईल ते मला माहित नाही. इथे जे कुणी पोलीस अधिकाऱी असतील त्यांना मी सांगतो की आत्ताच्या आत्ता पहिलं जाऊन ते बंद करा… आणि माझं एक म्हणणं आहे याबाबतीत जर समजा सरळ भाषेत समजत नसेल ना एकदा काय ते तिच्या आयला होऊनच जाऊदे… अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही. संभाजीनगरच्या पोलिसांना माझी नम्र विनंती आहे मी आपल्याला जे सांगतोय ते जर या पद्धतीने वागणार असतील.. त्यांना जर सरळ सांगून समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगात काय ताकद आहे ती यांना दाखवावीच लागेल.. आणि म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे की पहिल्यांदा हे थोबाडं बंद करा या लोकांची. माझी संपूर्ण देशवासीयांना अख्ख्या देशातल्या हिंदू बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे की बिलकुल मागचा पुढचा विचार करू नका. हे भोंगे उतरले गेलेच पाहिजेत. सगळ्या धार्मिक स्थळांवरचे… मग ते मंदिरांवरचे असतील तरीही… पण यांचे उतरल्यानंतर. जर हे ३ तारखेपर्यंत ऐकलं नाही तर ४ तारखेला हनुमान चालीसा ऐकू आलीच पाहिजे. पोलिसांकडून वाटल्यास परवानगी घ्या. रितसर लाऊड स्पीकरची परवानगी घ्या, त्यांना द्यावी लागते. पण ती परवानगी घेऊन आपण सगळ्या गोष्टी जोरात कराल आणि सामाजिक दृष्ट्या प्रलंबित असलेला हा प्रश्न कायमचा निकाली लागेल यासाठी सगळ्यांनी हातभार लावावा”
ADVERTISEMENT
राज ठाकरेंनी भाषणात केलेलं हे वक्तव्य आक्षेपार्ह आहे असं पोलिसांनी FIR मध्ये म्हटलं आहे. हे वक्तव्य आणि भाषणाचं सीसीटीव्ही फुटेज दोन्ही तपासलं असता भाषणातील वक्तव्यामुळे सभेला उपस्थित असलेल्या जनसमुदायाला कारवासाच्या शिक्षेस पात्र असणारा अपराध करण्यास चिथावणी मिळेल, त्यांच्याकडून शांतता भंग होईल. त्यांच्याकडून सार्वजनिक शांतता विरोधी अपराध किंवा दंग्यासारखा अपराध घडेल हे माहित असून ही मा. पोलीस आयुक्त औरंगाबाद यांनी लेखी पत्राने दिलेल्या सूचनांचं पालन करण्यात आलेलं नाही, असंही या FIR मध्ये म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT