CM शिंदेंच्या दसरा मेळाव्याला व्यासपीठावर राज ठाकरे दिसणार? सदा सरवणकरांचे संकेत

मुंबई तक

मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कमालीचा दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचे निमंत्रण देवून शिंदे यांनी दुसऱ्या ठाकरे जवळ करण्याची रणनीती आखली आहे का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचे निमंत्रण? राज ठाकरे, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कमालीचा दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचे निमंत्रण देवून शिंदे यांनी दुसऱ्या ठाकरे जवळ करण्याची रणनीती आखली आहे का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.

राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचे निमंत्रण?

राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे जर दसरा मेळाव्याला व्यासपीठावर दिसले तर त्यात आश्चर्य वाटायला नको, असे म्हणतं राज ठाकरे यांना शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाण्याची शक्यता असल्याचे संकेत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना दिले आहेत.

सरवणकर म्हणाले, जे कोणी हिंदुत्वासाठी एकत्रित आणण्याचे काम शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. यापूर्वीही वेगवेगळ्या पक्षांचे आणि हिंदुत्ववादी विचारांचे नेते शिवसेनेच्या व्यासपीठावर आलेले आहेत. त्यामुळे हे नेते उद्या व्यासपीठावर दिसले तर त्याबाबत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

दसऱ्याला एकनाथ शिंदेंचा ‘दुसरा’ मेळावा?, सदा सरवणकरांचा शिवाजी पार्कसाठी अर्ज

हे वाचलं का?

    follow whatsapp