Raj Thackeray: ”बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या जवळचे ‘बडवे’ सारखेच, मीही त्याचमुळे बाहेर पडलो”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्यात मागच्या अनेक दिवसांपासून राजकीय संघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर वेगळा राजकीय इतिहास लिहीला गेला. हे सर्व घडत असताना एक व्यक्ती मात्र यापासून दूर होती ती म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray). आता राज ठाकरे त्यांच्या आजारातून सावरत आहेत, त्यामुळे त्यांनी पुन्हा पक्षाचे काम सुरु केले आहे.

ADVERTISEMENT

राज ठाकरे यांनी झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक खुलासे केले आहेत. सध्याच्या परिस्थितीला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या जवळच्या बडव्यांमुळे आम्हाला त्रास होत होता म्हणून आम्ही बाहेर पडलो असे कारण दिले होते.

यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले ” नारायण राणे, छगन भुजबळ ज्यावेळी बाहेर पडले त्यांनीही अशीच टीका केली होती. आणि मी पण बाहेर पडलो याच कारणाने, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या जवळचे बडवे तेच आहेत असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

‘सध्याच्या परिस्थितीला उद्धव ठाकरेच जबाबदार’

राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीमध्ये काय झाले तेही सांगितले आहे. राज्यात जे काही घडलं त्याचे तुम्ही श्रेय तुम्ही घेऊ नका, जे काही घडलं ते तुम्ही किंवा अमित शाहांनी घडवले नाही तर हे सर्व उद्धव ठाकरेंनी घडवले आहे. त्यांचं श्रेय तुम्ही कसं काय काढून घेऊ शकता? कारण उद्धव ठाकरेंमुळे हे एकदा घडलेले नाही असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

आमदार फुटण्यामागे संजय राऊतांचा काय संबंध?

संजय राऊतांचा शिवसेना फुटण्यामागे काही हात आहे का? यावर राज ठाकरे म्हणाले ”आमदार फुटण्यामागे संजय राऊतांचा काय संबंध? ते रोज टीव्हीवरती येत असतात बोलत असतात, त्याने लोक इरिटेट होत असतात आमदार फुटत नसतात.”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT