राजापूर: भीषण अपघातात 2 लहान मुलींचा दुर्दैवी मृत्यू, परिसरावर शोककळा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राकेश गुडेकर, रत्नागिरी: राजापूर तालुक्यात मंगळवारी (7 डिसेंबर) झालेल्या एका भीषण अपघातात 2 लहान मुलींचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाकाळे येथे हा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये दोन लहान मुलींचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ADVERTISEMENT

सागरी महामार्गालगत असलेल्या बाकाळे या गावात जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या कामावर असलेल्या मजुरांच्या दोन लहान मुली या अपघातात मृत्युमुखी पडल्या असून दोन महिला जखमी झाल्या आहेत.

याबाबत नाटे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुलसी कुमारी कवली शिकारी (वय 14 वर्ष) कु. आराध्या अनिल राठोड (वय 5 वर्ष) या दुपारी सव्वा एकच्या आसपास जेवण आटपून डबे घेऊन आपल्या झोपडीकडे जाण्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभ्या होत्या.

हे वाचलं का?

यावेळी जैतापुरकडून देवगडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या MH-07-X-1572 या नंबरच्या आयशर टेम्पोने भरधाव वेगाने रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात जोरदार धडक दिली. यामध्ये तुलसी कुमारी कवली शिकारी हिचा जागीच मृत्यू झाला, तर आराध्या हिला जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत असताना तिचा मृत्यू झाला.

याशिवाय शिल्पा सुरेश राठोड( वय 20 वर्ष) सुनिता सुरेश राठोड( वय 35 वर्ष) सर्व राहणार विजापूर कर्नाटक. या दोघी जणी गंभीर जखमी असून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून भादवी 304अ, 279, 337, 338 मोटार वाहन कायदा कलम  134/177, 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचा टेम्पो देखील ताब्यात घेण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

साताऱ्यात थरकाप उडवणारा अपघात; कारचा चक्काचूर, दोन युवक जागीच ठार

आरोपी देवगड तालुक्यातील गिर्ये येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दुपारी अपघातानंतर त्याने अपघात स्थळापासून एक किलोमीटरवर असलेल्या पंगेरे येथे ट्रक उभा करून पलायन केले होते. असे स्थानिकांकडून पोलिसांकडून सांगण्यात आले.

ज्यानंतर पोलिसांकडून अपघातास कारणीभूत असलेले आयशर टेम्पो आणि वाहन चालकाला याचा शोध घेत त्याला तात्काळ ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी करत आहेत.

मात्र, या अपघाताच्या घटनेमुळे या परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT