अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेला अर्धनग्न करुन तुफान मारहाण, Video व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उदयपूर (राजस्थान) : राजस्थानमधील उदयपूर येथील एक Video सध्या बराच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका महिलेला अर्धनग्न करुन बेदम मारहाण करण्यात आल्याचं दिसतं आहे. महिलेचे कपडे फाडून तिला प्रचंड मारहाण करण्यात आली असून या सगळ्याचा व्हीडिओ देखील शूट करण्यात आला आहे. आता हाच व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल करण्यात आला.

ADVERTISEMENT

याप्रकरणी पीडितेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत आपल्याला न्याय मिळवून द्यावा आणि मारहाण करणाऱ्या महिलांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डबोक भागातील एका गावातील एक महिला रोजंदारीवर काम करत होती. काही दिवसांपूर्वीच असंच कामावरुन घरी परतत असताना तिला वाटेत ठेकेदार मोहन गमेती याची पत्नी कैलाशी व अन्य एका महिलेने तिला अडवलं आणि नंतर तिला झुडपात नेलं. त्यानंतर दोन्ही महिलांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढंच नव्हे तर तिचे कपडे देखील त्यांनी फाडले.

हे वाचलं का?

तसंच या सगळ्या प्रकाराचा व्हीडिओ आरोपी महिलांनी या शूट देखील केल्याचं समजंत आहे. याशिवाय सोशल मीडियावर हा व्हीडिओ व्हायरलही करण्यात आला आहे.

पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून महिलेला लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण

ADVERTISEMENT

व्हीडिओमध्ये एक आरोपी महिला पीडितेला तिचे पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचे सांगत प्रचंड शिविगाळ देखील करत आहे. या मारहाणीदरम्यान पीडिता आरोपी महिलांसमोर दयेची भीक मागत होती, मात्र दोन्ही महिलांना तिची अजिबात दया आली नाही आणि दोघींनी पीडित महिलेला मारहाण करणं सुरुच ठेवलं.

ADVERTISEMENT

विवाहित महिलेशी अनैतिक संबंध, मंदिरात गुपचूप लग्न; अन् नंतर…

पीडितेने एसपीला सांगितले की, तिच्यावर अत्याचार करणाऱ्या महिलांकडे ती दयेची भीक मागत होती, पण महिलांनी तिला मारहाण सुरूच ठेवली. सध्या पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली असून तपासही सुरू केला आहे. याप्रकरणी एसपी मनोज चौधरी म्हणाले की, लवकरच आरोपी महिलांवर कडक कारवाई केली जाईल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT