Rajya Sabha:”शिवसेनेचं ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं!”MIM च्या पाठिंब्यानंतर मनसेची टीका
राज्यसभेच्या निवडणुकीचा धुरळा सुरू झाला आहे. महाराष्ट्रात सहा जागांसाठी सात उमेदवार आहेत. सहाव्या जागेसाठी चुरस आहे. ही चुरस शिवसेना आणि भाजपमध्ये आहे. एक-एक मत अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आहे. विधानसभेचे आमदार या निवडणुकीत मतदान करतात. अपक्ष आमदारांची मतं, इतर छोट्या पक्षांची मतं मिळवण्यासाठी प्रयत्न केले गेले. आज सकाळी एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी ट्विट करून महाविकास […]
ADVERTISEMENT
राज्यसभेच्या निवडणुकीचा धुरळा सुरू झाला आहे. महाराष्ट्रात सहा जागांसाठी सात उमेदवार आहेत. सहाव्या जागेसाठी चुरस आहे. ही चुरस शिवसेना आणि भाजपमध्ये आहे. एक-एक मत अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आहे. विधानसभेचे आमदार या निवडणुकीत मतदान करतात. अपक्ष आमदारांची मतं, इतर छोट्या पक्षांची मतं मिळवण्यासाठी प्रयत्न केले गेले. आज सकाळी एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी ट्विट करून महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं आहे. ज्यानंतर मनसेने शिवसेनेवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
मनसेचे नेते गजानन काळे यांनी काय म्हटलं आहे?
राज्याची शोभा होईल अशी ही राज्यसभा निवडणूक सुरू आहे. जनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू आहे. त्या निजामाची अवलाद एमआयएमची मदत घेऊन जनाची नाही पण मनाचीही महाविकास आघाडीने सोडली आहे तर शिवसेनेचं नकली,ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे. असं म्हणत गजानन काळे यांनी महाविकास आघाडीवर आणि शिवसेनेवर टीका केली आहे.
हे वाचलं का?
“राज्याची शोभा” होईल अशी ही राज्यसभा निवडणूक सुरू आहे.
जनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू आहे.
त्या निजामाची अवलाद एमआयएमची मदत घेऊन जनाची नाही पण मनाचीही महाविकास आघाडीने सोडली आहे तर शिवसेनेचं नकली,ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे.— Gajanan Kale (@GajananKaleMNS) June 10, 2022
मनसेचे नेते राज ठाकरे यांनीही उद्धव ठाकरेंवर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका केली होती. ठाणे, पुणे तसंच औरंगाबाद यां ठिकाणी झालेल्या सभांमध्येही त्यांनी या सगळ्या गोष्टींवरून शिवसेनेवर टीका केली होती. आता एमआयमचा पाठिंबा घेतल्यानंतर चांगलीच टीका करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या उमेदवाराला एमआयएमच्या वतीने मतं देण्यात आली आहेत. त्याआधी जलील यांनी शिवसेना तसंच राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पहाटे इम्तियाज जलील यांनी पाठिंबा जाहीर केला. शिवसेनेशी आमचे वैचारिक आणि राजकीय मतभेद आहेत तरीही आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याचं जाहीर केलंय.
ADVERTISEMENT
राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान कसं होतं? आमदारांना कोणत्या गोष्टी कराव्या लागतात?
ADVERTISEMENT
काय म्हटलंय जलील यांनी?
भाजपचा पराभव करण्यासाठी आमच्या पक्षाने महाविकास आघाडीसाठी मतदान करण्याचं ठरवलं आहे. राज्यसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देणार आहोत. आमच्या राजकीय भूमिका वेगवेगळ्या आहेत. तसंच काही मतभेदही आहेत. मात्र भाजपला हरवावं या उद्देशाने आम्ही शिवसेनेचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीला मतदान करतो आहोत असं इम्तियाज जलील यांनी जाहीर केलं आहे.
संपूर्ण राज्याचं तसंच देशाचं लक्ष लागलेली राज्यसभा निवडणूक आज पार पडते आहे. राज्यात निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. सहा जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये भाजपचे दोन, शिवसेना एक, राष्ट्रवादी एक आणि काँग्रेस एक असे उमेदवार निवडून येतील हे निश्चित आहे. मात्र सहाव्या जागेसाठी चुरस रंगणार आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी या जागेसाठी उमेदवार दिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT