Rajya sabha Election : ठरलं! निवडणूक होणारच, दिवसभरात काय घडलं?
Rajya Sabha election राज्यसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडीने निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले गेले. प्रस्ताव, चर्चा, बैठका यांचं सत्र शुक्रवारी (३ जून) दिवसभर रंगलं. मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत काहीही ठोस पर्याय निघाला नाही. त्यामुळे निवडणूक होणारच हे स्पष्ट झालं. राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha election) बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी […]
ADVERTISEMENT

Rajya Sabha election राज्यसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडीने निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले गेले. प्रस्ताव, चर्चा, बैठका यांचं सत्र शुक्रवारी (३ जून) दिवसभर रंगलं. मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत काहीही ठोस पर्याय निघाला नाही. त्यामुळे निवडणूक होणारच हे स्पष्ट झालं.
राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha election) बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गेले होते. शिवसेना नेते अनिल देसाई, काँग्रेस नेते सुनील केदार आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.
या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या या शिष्टमंडळाने भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली.
भाजपने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यास मदत केल्यास त्याची परतफेड विधान परिषद निवडणुकीत केली जाईल. त्यानुसार विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपला आणखी एक जागा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. विधान परिषदेसाठी १० जागांवर निवडणूक होणार आहे. संख्याबळ पाहिलं तर भाजपच्या चार जागा निश्चित मानल्या जात आहेत. मविआकडून भाजपला पाचवी जागा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.