राज्यसभा निवडणूक: मनसेच्या एकमेव आमदाराने सांगितलं कोणाला करणार मतदान!
मिथिलेश गुप्ता, कल्याण: राज्यसभा निवडणुकीत सहाव्या उमेदवारासाठी महाविकास आघाडी आणि भाजपला प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी छोटे पक्ष आणि अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. अशातच आता मनसेच्या एकमेव आमदाराने राज्यसभा निवडणुकीत आपली काय भूमिका असणार आहे. याबाबत भाष्य केलं आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, ‘या क्षणाला […]
ADVERTISEMENT

मिथिलेश गुप्ता, कल्याण: राज्यसभा निवडणुकीत सहाव्या उमेदवारासाठी महाविकास आघाडी आणि भाजपला प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी छोटे पक्ष आणि अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. अशातच आता मनसेच्या एकमेव आमदाराने राज्यसभा निवडणुकीत आपली काय भूमिका असणार आहे. याबाबत भाष्य केलं आहे.
मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, ‘या क्षणाला तरी मला राज साहेबांकडून काही आदेश आलेला नाही. त्यामुळे ते जसे सांगतील त्याप्रमाणे पुढे वाटचाल असेल. मतदान करायचं, कोणाला करायचं की तटस्थ रहायचे हा सर्वस्वी पक्षाचा विषय आहे. त्यामुळे राज साहेब सांगतील त्याप्रमाणे आम्ही मतदान करू किंवा तटस्थ राहू.’
राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मनसे कुणाच्या पारड्यात मत टाकणार की तटस्थ राहणार याबाबत बोलताना आमदार पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यसभेच्या 6 जागांसाठी एकूण 7 उमेदवार रिंगणात असून यंदा या निवडणुकीत चुरस वाढली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपला आपल्या आमदारांसह अपक्ष आणि छोट्या पक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यामुळे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचंही मत मोलाचे ठरणार आहे.