मतदान सुरु असतानाच शरद पवार पुण्याच्या दिशेने, जितेंद्र आव्हाड म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान आज सकाळपासून मतदान सुरु आहे. २३८ आमदारांनी सकाळपासून मतदान केलेले आहे. मतदान केल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई तकला प्रतिक्रिया दिलेली आहे. इकडे राज्यसभेसाठी मतदान सुरु असताना शरद पवार मात्र पुण्याला निघाले आहेत, त्याबाबत विचारले असता जितेंद्र आव्हाड म्हणाले 60 वर्षांनंतरही तुम्हाला असं वाटतं शरद पवारांनी मतदानासाठी थांबावं.

ADVERTISEMENT

शरद पवारांची इथे काय गरज आहे, त्यांनी एवढे नेते तयार करुन ठेवले आहेत. काल रात्री काही माध्यमांमध्ये बातम्या आल्या होत्या की शिवसेन- राष्ट्रवादीमध्ये कोट्यावरुन टोकाची नाराजी आहे, याबाबत विचारले असता जितेंद्र आव्हाड म्हणाले नाराजी वगैरे काही नाही, पत्रकारांना माहिती देणारे फसवतात.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील विधान भवनात हजर आहेत. याबाबत जितेंद्र आव्हाड म्हणला की मुख्यमंत्री आहेत ते या सभागृहाचे प्रमुख आहेत. त्यांचं उपस्थित राहणं क्रमप्राप्त आहे. शरद पवारांचा काय संबंध? त्यांनी इतके नेते जमा करून ठेवलेत ते आत आहेत. विजय आमचाच होईल असे म्हणत आव्हाडांनी भाजपवरती निशाणा साधला आहे. भाजप नेहमीच कॉन्फिडंट असते. ती त्यांची स्टाईल आहे. कुठलाही विलन आत जाताना जोरात छाती काढून जात असतो. नंतर परत येतो असा टोमणा जितेंद्र आव्हाडांनी भाजपला लगावला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT