‘पवारांच्या तुकड्यावर जगणाऱ्यांनी…’, CM शिंदेंच्या सभेपूर्वीच रामदास कदमांचा ठाकरेंवर वार
Ramdas Kadam criticize Sanjay Raut : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांची आज खेडमध्ये सभा आहे.माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या मतदारसंघात ही सभा होणार आहे.काहीच दिवसांपुर्वी याच मतदार संघात उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांची सभा पार पडली होती.या सभेत त्यांनी शिंदे गटावर प्रहार केला होता. या ठाकरेंच्या सभेला शिंदे गट सभेच्या माध्यमातून प्रत्युत्तर […]
ADVERTISEMENT

Ramdas Kadam criticize Sanjay Raut : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांची आज खेडमध्ये सभा आहे.माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या मतदारसंघात ही सभा होणार आहे.काहीच दिवसांपुर्वी याच मतदार संघात उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांची सभा पार पडली होती.या सभेत त्यांनी शिंदे गटावर प्रहार केला होता. या ठाकरेंच्या सभेला शिंदे गट सभेच्या माध्यमातून प्रत्युत्तर देणार आहे. मात्र या सभेपुर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. शरद पवारांच्या तुकड्यावरती कोण जगतंय, हे उभा देश पाहतोय, अशा शब्दात रामदास कदम यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. तसेच ही खेडमधली रेकॉर्ड ब्रेक सभा असेल आणि सर्व टीकाकारांना या सभेच्या माध्यमातून उत्तर दिला जाईल असा इशारा कदम यांनी दिला आहे. (ramdas kadam criticize sanjay raut udhhav thackeray Just before cm eknath Shinde’s meeting)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सभेपुर्वी रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी कोटेश्वरी मानई देवीची पुजा करत साकडं घातलं. मुख्यमंत्री खेडमध्ये येतातय, त्यांनी माझ्या कोकणासाठी काहीतरी देऊन जाऊ देत, ही सभा राजकिय नको, तर या सभेचा लाभ माझ्या कोकणासाठी व्हावा, असे रामदास कदम म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील अनेक चांगले निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेत. निर्णयाचा सपाटाच त्यांनी लावलाय. केंद्रातून पैसा आणतायत आणि महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतायत. माझा कोकण देखील विकासापासून लांब असता कामा नये, म्हणून देवीला साकडं घातलंय. एकनाथ शिंदेना सुबुद्धी दे, बुद्धी दे आणि चांगल्या निर्णयाची घोषणा त्यांच्याकडून होऊ देत,असे कदम यांनी सांगितले आहे.
‘चुंबन, भीती आणि ‘नाटू-नाटू’, संजय राऊतांची ‘रोखठोक’ टीका, कोणावर निशाणा?
मुख्यमंत्र्यांनी काहिच दिलं नाही….
खेडच्या सभेत उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) म्हणाले होते, माझ्या हातात काही नाही,मी खाली हाताने आलोय. खरं तर अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी पुष्कळस द्यायला हवं होतं, पण तेही त्यांनी दिले नाही,अशी टीका कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती.