रणवीर सिंह-दीपिका पदुकोणची होणार शाहरुख-सलमानचे शेजारी; मुंबईत घेतलं ११९ कोटींचं घर

मुंबई तक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लवकरच अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता सलमान खान यांचे शेजारी होणार आहेत. रणवीर सिंहने वांद्रे भागातील सागर रेशम रेसिडेन्शिअल टॉवरमध्ये एक अलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. रणवीर सिंह आणि दीपिक पदुकोणच्या या नवीन घरातून अरबी समुद्राचं सुंदर दृश्य नजरेस पडतं. रणवीर सिंह-दीपिका पदुकोणचं हे घर कसं असणार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लवकरच अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता सलमान खान यांचे शेजारी होणार आहेत. रणवीर सिंहने वांद्रे भागातील सागर रेशम रेसिडेन्शिअल टॉवरमध्ये एक अलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे.

रणवीर सिंह आणि दीपिक पदुकोणच्या या नवीन घरातून अरबी समुद्राचं सुंदर दृश्य नजरेस पडतं. रणवीर सिंह-दीपिका पदुकोणचं हे घर कसं असणार आहे, याबद्दलची माहितीही समोर आली आहे.

रणवीर सिंह-दीपिका पदुकोणने केली महागडी घर खरेदी

हे घर रणवीर सिंहने खरेदी केलं आहे. या अपार्टमेंटचं सध्या काम सुरू आहे. रणवीर सिंहने जे अपार्टमेंट खरेदी केलं आहे, तिथून सुमद्राच मन प्रसन्न करणार दृश्य दिसतं. रिपोर्टनुसार रणवीर सिंहने हे घर तब्बल ११९ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp