रश्मी ठाकरेंकडे राज्याचं मुख्यमंत्रीपद? शिवसेना आमदाराचं मोठं विधान, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बिघडलेली तब्येत हा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात महत्वाचा मुद्दा ठरला होता. शस्त्रक्रीयेनंतर डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळेच मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनात हजर राहिले नव्हते. या काळात विरोधी पक्षातील भाजपने राज्याचं नेतृत्व हे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंकडे सोपवण्याबद्दल विधान केलं होतं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी बोलत असताना शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रश्मी ठाकरे या मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात असं विधान केलं आहे. रश्मी ताईंची काम करण्याची पद्धत एक अभ्यासू महिला म्हणून आहे. रश्मी ठाकरे पडद्याच्या पुढे नाहीत, मात्र महाराष्ट्राच्या राजकारणापैकी बरंच राजकारण त्यांना माहिती आहे. त्या नेहमी उद्धव ठाकरेंसोबत असतात. उद्धव साहेबांचा आदेश असला तर मला वाटतं काहीही होऊ शकतं आणि त्यांच्यावर जबाबदारी देऊ शकतात. सामनाच्या मुख्य संपादक म्हणूनही त्या उत्तम काम करत आहेत,” असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांनी कोरोना टास्क फोर्स तसेच मंत्रीमंडळाच्या बैठकींना व्हर्चुअल हजेरी लावली आहे. शिवसेनेकडून वारंवार मुख्यमंत्र्यांची तब्येत उत्तम असून ते लवकरच कामकाजात सहभागी होतील असं सांगण्यात येत आहे. परंतू विरोधकांनी वारंवार मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचा मुद्दा उचलून धरला आहे. अधिवेशन काळात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार नितेश राणे यांनीही या विषयावर भाष्य केलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रश्मी ठाकरेंच्या कार्यपद्धतीचं कौतुक करताना अब्दुल सत्तार यांनी, “लोकशाहीच्या मार्गाने लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, त्यांना न्याय देण्यासाठी कशा उपाययोजना करायला पाहिजे यासाठी राज्यात एक आदर्श महिला म्हणून त्यांचं नाव आहे. तसा काही निर्णय झाला तर सर्व शिवसैनिक त्याचं स्वागत करतील”, अस स्पष्ट केलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT