राज्याचा Recovery Rate ९३ टक्क्यांवर, आजही बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या अधिक
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात आता परिस्थिती हळुहळु नियंत्रणात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या रुग्णसंख्येपेक्षा रुग्ण बरे होऊन घरी परतण्याचा ट्रेंड आजही कायम राहिला आहे. आज राज्यात २० हजार २९५ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून ३१ हजार ९६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउनची […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात आता परिस्थिती हळुहळु नियंत्रणात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या रुग्णसंख्येपेक्षा रुग्ण बरे होऊन घरी परतण्याचा ट्रेंड आजही कायम राहिला आहे. आज राज्यात २० हजार २९५ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून ३१ हजार ९६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउनची घोषणा केली होती. याचा फायदा रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यामध्ये होताना दिसत आहे. सध्याच्या घडीला राज्याचा रिकव्हरी रेट हा ९३.४६ टक्के इतका आहे. आज ४४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ही संख्या अजून कमी करण्यासाठी राज्य सरकारला अधिक प्रयत्न करावे लागणार असं दिसंतय.
ज्या भागांमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे तिकडे राज्य सरकार निर्बंध उठवण्याचा विचार करत आहे. परंतू रुग्णसंख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये यापुढे अधिक लक्ष दिलं जाणार असून या भागांत होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
दुसरीकडे मुंबईतही आज १ हजार ४८ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून १ हजार ३५९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत आज २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.










