धनंजय मुंडेंना 5 कोटींसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्माला दोन दिवसांची पोलीस कोठडी
धनंजय मुंडे यांना ५ कोटींसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्माला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर रेणू शर्माला अटक करण्यात आली. त्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंयज मुंडे यांनी एका महिलेच्या विरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल […]
ADVERTISEMENT

धनंजय मुंडे यांना ५ कोटींसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्माला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर रेणू शर्माला अटक करण्यात आली. त्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंयज मुंडे यांनी एका महिलेच्या विरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही महिला परिचयाची असून तिने पाच कोटी रूपयांची खंडणी आणि दुकान नावावर करा अशी मागणी केली होती. तुम्ही असं केलं नाही तर बलात्काराची तक्रार सोशल मीडियावर करून तुमचं मंत्रिपद घालवेन अशी धमकी देण्यात आल्याचंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं. ही महिला दुसरीतिसरी कुणीही नसून रेणू शर्मा आहे. तिला पोलिसांनी अटक केली आहे.
‘५ कोटींची रक्कम द्या, नाहीतर….’ ; धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्माला अटक
कोण आहे रेणू शर्मा? आणि काय आहे प्रकरण?