मुंबईत Vaccination Scam? सोसायटीतील 390 जणांनी बोगस लस दिल्याचा आरोप केल्याने खळबळ

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मुंबई लसीकरण घोटाळा अर्थात Vaccination Scam झाला आहे का? असा प्रश्न पडला आहे याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मुंबईतल्या एका हाऊसिंग सोसायटीतल्या 390 रहिवाशांनी आपल्याला बोगस लस दिल्याचा आरोप केला आहे. मुंबईतल्या सोसायटीतल्या रहिवाशांनी केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून मुंबईतल्या हिरानंदानी इस्टेट या सोसायटीत राहणाऱ्या 30 मे रोजी 390 जणांना कोव्हिशिल्ड ही लस देण्यात आली. सोसायटीच्या आवारातच लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. राजेश पांडे नावाचा एक जण यासाठी सोसायटीत आला होता त्याने आपण कोकिलाबेन अंबानी रूग्णालयाचे आहोत असं सोसायटीच्या कमिटी मेंबर्सना सांगितलं. संजय गुप्ता यांनी हे लसीकरण शिबीर घेतल आणि महेंद्र सिंग यांनी सोसायटीतल्या सदस्यांकडून लसींचे पैसे घेतले अशी माहिती आरोप करणाऱ्यांनी दिली आहे.

नेमका आरोप काय आहे?

हे वाचलं का?

या इमारतीत राहणारे हितेश पटेल यांनी असं म्हटलं आहे की एका डोससाठी आमच्याकडून 1260 रूपये घेण्यात आले. माझ्या मुलाने याच ठिकाणी झालेल्या लसीकरण शिबीरात लस घेतली. मात्र आम्हाला लस घेतल्यानंतर कोणताही मेसेज आला नाही. तसंच आम्हाला लस घेतल्यानंतर कोणतेही फोटो किंवा सेल्फीही काढू दिले गेले नाहीत. 1260 रूपये एका डोससाठी या प्रमाणे सोसायटीतल्या 390 जणांनी लसीकरण शिबीर आयोजित करणाऱ्याला पाच लाख रूपय दिले.

आम्ही ज्या ज्या सदस्यांनी लस घेतली त्यापैकी एकालाही कोणतेही साईड इफेक्ट म्हणजे ताप येणं, अंग दुखणं असं काहीही झालं नाही. एवढंच काय आम्हाला लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचं प्रमाणपत्रही दिलं गेलं नाही. त्यामुळे आम्ही हा नेमका काय प्रकार घडला आहे याचा शोध घेण्यास सुरूवात केली. साधारण 15 दिवस गेल्यानंतर आम्हाला प्रमाणपत्रं देण्यात आली. मात्र असं कोणतंही शिबीर रूग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलं नव्हतं असं रूग्णालयाने स्पष्ट केल्याने आम्हाला बनावट लस दिले गेले असा आरोप आता रहिवाशांनी केला आहे.

ADVERTISEMENT

या प्रकरणात सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी संबंधित रहिवाशांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याचं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. संबंधित रुग्णालयातील अधिकारी आणि सोसायटीतील नागरिक यांची चौकशी केली जाईल. जर यात काही गैरकारभार झाला असेल, तर कारवाई केली जाईल, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

लसीकरण शिबीर कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलचं नाव सांगून घेण्यात आलं होतं. मात्र, सोसायटीतील लसीकरण झालेल्या रहिवाशांना देण्यात आलेली प्रमाणपत्र वेगवेगळ्या रुग्णालयांची होती. नानावटी, लाईफलाईन, नेस्को बीएमसी लसीकरण केंद्र इत्यादी. यामुळे सोसायटीतील लसीकरण झालेल्या नागरिकांची शंका आणखी बळावली. त्यांनी प्रमाणपत्र मिळालेल्या रुग्णालयांशी संपर्क केला. त्यावेळी सोसायटीमध्ये लस पुरवत नसल्याचं रुग्णालयांनी सांगितलं.

यासंदर्भात नानावटी रुग्णालयाने निवेदन प्रसिद्ध केलं. ज्यात म्हटलं आहे की, नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावाने कांदिवलीतील हाऊस सोसायटीतील नागरिकांना लसीकरण प्रमाणपत्र दिली गेली असल्याचं अलिकडेच निदर्शनास आलं आहे. नागरी सोसायट्यांमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं लसीकरण शिबीर आयोजित करत नाही, हे स्पष्ट करत असून, या प्रकरणी संबंधित विभागाला माहिती देण्यात आली आहे आणि तक्रारही नोंदवत आहोत,” असं नानावटी रुग्णालयाने स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT