रिहानाचा सवाल- शेतकऱ्यांबद्दल बोलत का नाही? कंगना म्हणाली, कारण ते
नव्याने आलेल्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकरी आणि सरकार यांच्यात कोणताच तोडगा निघण्याची चिन्हं दिसत नाही. त्याच आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. अशातच आता जगप्रसिद्ध पॉप सिंगर आणि परफॉर्मर रिहाना नेसुद्धा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आवाज रिहानापर्यंत पोचलाय. रिहानाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत ट्विट केलंय. यावरूनच बॉलिवूड […]
ADVERTISEMENT

नव्याने आलेल्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकरी आणि सरकार यांच्यात कोणताच तोडगा निघण्याची चिन्हं दिसत नाही. त्याच आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. अशातच आता जगप्रसिद्ध पॉप सिंगर आणि परफॉर्मर रिहाना नेसुद्धा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आवाज रिहानापर्यंत पोचलाय. रिहानाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत ट्विट केलंय. यावरूनच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने तिच्यावर टीका केलीय.
रिहानाने ट्विटरवर एक बातमी शेअर केलीय. यात बातमीत शेतकरी आंदोलनामुळे इंटरनेट सेवा बाधित झाल्याचा उल्लेख आहे. तसंच शेतकरी आंदोलनामुळे हरयाणाच्या अनेक जिल्ह्यात इंटरनेट सेवा कशी बंद करण्यात आलीय, याची माहितीही या बातमीत देण्यात आलीय.