अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, सीबीआय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्याने दिवाळी तुरुंगातच
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाने फेटाळला आहे. ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात हायकोर्टाने मागच्या आठवड्यात अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला होता. त्यामुळे आजही जामीन मंजूर होईल आणि त्यांची दिवाळी घरी साजरी होईल असं वाटलं होतं मात्र प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. सीबीआय कोर्टाने जामीन नाकारल्याने अनिल देशमुख यांची […]
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाने फेटाळला आहे. ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात हायकोर्टाने मागच्या आठवड्यात अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला होता. त्यामुळे आजही जामीन मंजूर होईल आणि त्यांची दिवाळी घरी साजरी होईल असं वाटलं होतं मात्र प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. सीबीआय कोर्टाने जामीन नाकारल्याने अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे.
ADVERTISEMENT
अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच
मनी लाँड्रींग प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. ११ महिने तुरुंगवास भोगल्यानंतर आता गेल्या आठवड्यात त्यांना कोर्टाचा दिलासा मिळाला. त्यानंतर आता सीबीआय कोर्टाकडूनही जामीन मिळेल असं वाटलं होतं मात्र सीबीआय कोर्टाने जामीन फेटाळला आहे त्यामुळे अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे.
अनिल देशमुख हृदयविकाराने त्रस्त
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे हृदयविकाराने त्रस्त आहेत. खासगी रूग्णालयात उपचार घेता यावेत ही मागणी त्यांनी कोर्टाकडे केली होती जी मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता मुंबईतल्या जसलोक या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. चार दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
हे वाचलं का?
अनिल देशमुखांवर नेमका आरोप काय ?
मुंबईतल्या बार आणि रेस्तराँमधून मालकांकडून खंडणी आणि वसुलीबाबत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर मुंबई हायकोर्टाने या प्रकरणी सीबीआयच्या प्राथमिक चौकशीचा आदेश दिला. त्यानंतर प्राथमिक चौकशीच्या अंती सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत FIR नोंदवला. या एफआयआरच्या आधारे ईडीने अनिल देशमुख आणि त्यांची स्वीय सचिव संजीव पलांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांनीही अटक केली. मुंबईतल्या बार आणि रेस्तराँकडून खंडणी म्हणून उकळलेली चार कोटींहून अधिक जास्त रक्कम अनिल देशमुख यांनी नागपूरच्या त्यांच्या रयत शिक्षण संस्थेत वळवली आणि मनी लाँड्रींग केलं असा आरोप त्यांच्यावर ईडीने ठेवला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT