अत्तर व्यापारी पियूष जैनच्या घरात 257 कोटी, 20 किलोहून जास्त सोनं जाणून घ्या काय काय हाती लागलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कानपूरचे अत्तर व्यापारी पियूष जैन यांच्या घरात सापडलेली संपत्ती पाहून कोणाचेही डोळे दीपतील. कारण त्यांच्या घरात सापडलेल्या नोटा थोड्या थोडक्या नाही 257 कोटी रूपये आयकर विभागाला आढळले आहेत. कानपूर, कनौज या ठिकाणी छापेमारी केल्यानंतर आयटी विभागाला आत्तापर्यंत 280 कोटींची संपत्ती मिळाली आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार कानपूर जीएसटीचे संयुक्त आयुक्त सुरेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पियूष जैनला कर चोरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पुढच्या कारवाईसाठी त्याला कानपूरहून अहमदाबादला नेलं जाऊ शकतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महत्त्वाचा मुद्दा

एका अन्य अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर हे सांगितलं की पियूष जैनच्या घरात आणि इतर ठिकाणी मारलेल्या छाप्यांमध्ये 257 कोटी रूपये मिळाले आहेत. तसंच सोनं आणि चांदीही आढळली आहे. पियूष जैनच्या घरात एक तळघर आढळलं आहे तसंच एका फ्लॅटमध्ये 300 चाव्याही सापडल्या आहेत. या सगळ्याबाबत DGGI ने अधिकृत माहिती देणं बाकी आहे.

ADVERTISEMENT

24 डिसेंबरला या संदर्भातली माहिती समोर आली होती. त्यावेळी आयटी विभागाने जी धाड टाकली त्यात त्यांना 24 तासात आठ मशीन्सना पैसे मोजताना 150 कोटी रूपये आढळले होते. त्यानंतरही ही मोजदाद सुरूच होती. आत्तापर्यंत आयकर विभागाला 257 कोटी आणि 20 किलोहून जास्त सोनं-चांदी आढळली आहे.

ADVERTISEMENT

आठ मशीन्सना पैसे मोजण्यासाठी अपुरे पडले 24 तास, अत्तर व्यावसायिकाच्या घरात पैशांचा ढिग!

पियूष जैनपर्यंत कसे पोहचल्या तपास यंत्रणा?

अहमदाबाद डीजीजीआय टीमने एक ट्रक पकडला होता. या ट्रकमध्ये अनेक कंपन्यांची बनावट बिलं होती. ही सगळी बिलं 50 हजार किंवा त्यापेक्षा कमी किंमतीचे होती. यानंतर डीजीजीआयने कापनूरच्या ट्रान्सपोर्टरकडेही छापेमारी केली. तिथे 200 बनावट बिलं मिळाली. या खोट्या बिलांवरून पियूष जैनपर्यंत एजन्सी पोहचल्या. त्यानंतर डीजीजीआयने पियूष जैन यांच्या घरी छापेमारी केली. तिथे त्यांनी पाहिलं की कपाटात नोटांची बंडलं आढळली आणि मोठ्या प्रमाणावर पैसेही आढळले. हे पैसे इतक्या मोठ्या प्रमाणात होते की ते मोजताना आयटी विभागाला एक अख्खा दिवसही कमी पडला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT