Rss Chief : …तोपर्यंत आपल्याला चीनसमोर झुकावंच लागेल; भागवत यांचं मोठं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘आपण इंटरनेट आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करतोय जे मूळचं भारतातील नाहीत. आपण चीनविरोधात कितीही ओरडून बोललो, तरी आपल्या फोनमध्ये ज्या गोष्टी आहेत; त्या सर्व चीनमधूनच येतात आणि त्यामुळेच आपण जोपर्यंत चीनवर अवलंबून असू, तोपर्यंत आपल्याला चीनसमोर झुकावंच लागेल’, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Rss Chief Mohan Bhagwat) यांनी केलं. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.

ADVERTISEMENT

मुंबईतील आयईएस राजा शाळेत सरसंघचालक मोहन भागवत यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी देशाच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं. ‘सिंकदराने आक्रमण करण्यापूर्वीही देशांवर आक्रमण होतच होती. आक्रमणांना आपण १५ ऑगस्ट रोजी पूर्णविराम दिला. जेव्हा परदेशी आक्रमण झाली, तेव्हा संघर्ष होत असे. या लढाया लढणारे महापुरुष आपल्या प्रेरणा देतात. आज त्यांचं स्मरण केलं पाहिजे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला. आपण पारतंत्र्यातून मुक्त झालो’, असं मोहन भागवत म्हणाले.

‘राष्ट्रध्वजाकडे बघितलं तर लक्षात येईल की, त्यासारखं राहायला हवं. राष्ट्रध्वजातील भगवा रंग त्याग, पावित्र्याची प्रेरणा देतो. हा भगवा नेहमी उंच राहावा हेच आपलं लक्ष्य आहे. त्यासाठी ज्ञानाधारित समाज निर्माण व्हायला हवा’, असंही भागवत म्हणाले.

हे वाचलं का?

यावेळी सरसंघचालक भागवत यांनी भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधलं. आपण कितीही चीनबद्दल ओरड केली, तर तुमच्या फोनमध्ये ज्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या चीनमधून येतात. आपण जे इंटरनेट वापरतो किंवा तंत्रज्ञान वापरतो, ते मूळात भारतातलं नाही. त्यामुळे जोपर्यंत आपण चीनवर अवलंबून राहू, तोपर्यंत आपल्याला चीनसमोर झुकावंच लागेल’, असं मत भागवत यांनी मांडलं.

‘स्वदेशी म्हणजे सगळंच सोडून देणं नाही’

ADVERTISEMENT

या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी स्वदेशीच्या मुद्द्यावरही भूमिका मांडली. ‘स्वदेशीचा अर्थ सगळंच सोडून द्यायचं असा नाही. आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, देवाण-घेवाणही होईल, पण आपल्या अटींवर. आपली मर्जी असेल. त्यासाठीच स्वावलंबी व्हायचं आहे. आत्मनिर्भतेतून रोजगार निर्मिती होईल. नाहीतर मग नोकरी जाते आणि हिंसेचे रस्ते खुले होतात. इथे स्वदेशीचा अर्थच आत्मनिर्भरता आणि अहिंसा असा आहे’, असं भागवत यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT