कॅनडा: कोरोना लसीकरणामुळे गोंधळ, पंतप्रधान जस्टिन कुटुंबासह गुप्त ठिकाणी, हाय अलर्ट जारी

मुंबई तक

ओटावा (कॅनडा): कॅनडामध्ये कोरोना लस अनिवार्य करण्यात आल्याने त्याविरोधात आता देशभरात जोरदार निदर्शने सुरू आहेत. याच निदर्शनांदरम्यान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Canadian PM Justin Trudeau) यांनी आपल्या कुटुंबासह राहतं घर सोडलं आहे. निदर्शनांनंतर जस्टिन ट्रुडो हे आपल्या कुटुंबीयांसह गुप्त ठिकाणी गेल्याचे वृत्त समोर आलं आहे. वास्तविक, ट्रुडो सरकारने ट्रक चालकांना अमेरिकेची सीमा ओलांडण्यासाठी लसीकरण करणे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ओटावा (कॅनडा): कॅनडामध्ये कोरोना लस अनिवार्य करण्यात आल्याने त्याविरोधात आता देशभरात जोरदार निदर्शने सुरू आहेत. याच निदर्शनांदरम्यान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Canadian PM Justin Trudeau) यांनी आपल्या कुटुंबासह राहतं घर सोडलं आहे.

निदर्शनांनंतर जस्टिन ट्रुडो हे आपल्या कुटुंबीयांसह गुप्त ठिकाणी गेल्याचे वृत्त समोर आलं आहे. वास्तविक, ट्रुडो सरकारने ट्रक चालकांना अमेरिकेची सीमा ओलांडण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक केले आहे. याबाबत वाहनचालकांनी विरोध सुरू केला आहे.

आंदोलकांनी कोविड निर्बंधांची तुलना फॅसिझमशी केली आहे. शनिवारी राजधानीत निदर्शने करत लोकांनी पीएम ट्रुडो यांच्यावर जोरदार टीका केली. आंदोलकांपैकी एकाने सांगितले की, त्यांना असे वाटते की लसीकरण अनिवार्य करणे हे आरोग्याशी संबंधित नाही, परंतु गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही सरकारची चाल आहे.

कॅनडात निदर्शने किती उग्र आहेत, याचा अंदाज यावरून येईल की, 50 हजार ट्रकचालकांनी शनिवारी राजधानी ओटावा येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घातला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp