Russia-Ukraine War : अमेरिकेची पुतिनच्या संपत्तीवर टाच; 27 देशांचा युक्रेनला मदतीचा हात
Russia-Ukraine War : गुरुवारी पहाटे सुरू झालेलं रशिया-युक्रेन युद्ध तिसरा दिवस उजाडला तरीही सुरूच आहे. संघर्षाची धग कमी झालेली नसून उलट कीवचा पाडाव करण्यासाठी रशिया आणखी आक्रमक झाल्याचं दिसत आहे. विशेष लष्करी मोहिमे आडून रशियाकडून युक्रेन होत असलेल्या हल्ल्यांच्या दरम्यान आता ब्रिटन, अमेरिका, युरोपीय युनियनमधील देशांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. Russia Ukraine Crisis : कीवमध्ये […]
ADVERTISEMENT

Russia-Ukraine War : गुरुवारी पहाटे सुरू झालेलं रशिया-युक्रेन युद्ध तिसरा दिवस उजाडला तरीही सुरूच आहे. संघर्षाची धग कमी झालेली नसून उलट कीवचा पाडाव करण्यासाठी रशिया आणखी आक्रमक झाल्याचं दिसत आहे. विशेष लष्करी मोहिमे आडून रशियाकडून युक्रेन होत असलेल्या हल्ल्यांच्या दरम्यान आता ब्रिटन, अमेरिका, युरोपीय युनियनमधील देशांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Russia Ukraine Crisis : कीवमध्ये रशियाकडून मिसाईल हल्ला; घटनेचा व्हिडीओ आला समोर
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला पाश्चिमात्य देशांकडून विरोध होत आहे. रशिया विरोधात आता पाश्चिमात्य राष्ट्र एकवटताना दिसून येत असून, युरोपीय संघ आणि ब्रिटन नंतर आता कॅनडा, अमेरिका यांच्यासह अनेक देशांनी रशियावर कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्याचबरोबर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव, रशियन लष्करप्रमुख यांची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
युक्रेनला मदत करण्यावर 27 देश सहमत









