युक्रेनमध्ये अडकलेले 200 हून जास्त भारतीय मायदेशी परतले
युक्रेन-रशियामध्ये तणाव सुरु आहे. रशियाने युक्रेनवर हल्लाही केला आहे. अशात एक चांगली बातमी समोर आली आहे ती म्हणजे युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय त्यांच्या देशात परतले आहेत. यापैकी बहुतेक जण युक्रेनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानंतर युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनेक स्फोट ऐकू येत आहेत. युक्रेनचे […]
ADVERTISEMENT

युक्रेन-रशियामध्ये तणाव सुरु आहे. रशियाने युक्रेनवर हल्लाही केला आहे. अशात एक चांगली बातमी समोर आली आहे ती म्हणजे युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय त्यांच्या देशात परतले आहेत. यापैकी बहुतेक जण युक्रेनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानंतर युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनेक स्फोट ऐकू येत आहेत. युक्रेनचे तिसरे मोठे शहर क्रेमटोर्स्क आणि ओडेसा येथे स्फोटाचा आवाज ऐकू येत आहेत.
आणीबाणीची बातमी मिळताच मायदेशी परतले विद्यार्थी
युक्रेनमधून भारतात परतलेल्या एका विद्यार्थ्याने दिल्ली विमानतळावर सांगितले की, ‘काल रात्री आम्हाला युक्रेनमध्ये 30 दिवसांच्या आपत्कालीन परिस्थितीची बातमी मिळाली आणि त्यानंतर आम्ही घरी परतलो.’ तर एमबीबीएसच्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, ‘मी जिथे राहत होतो, तिथे परिस्थिती ठीक आहे. कारण हे ठिकाण सीमेपासून खूप दूर आहे. पण आमच्या दूतावासाने आम्हाला मायदेशी परतण्यास सांगितले, अॅडव्हायझरी दिल्यानंतर मी परत आलो.’ युक्रेनमधून परतलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे फोटो समोर आले आहेत. विद्यार्थ्यांना पाहून त्यांचे पालक भावूक झाल्याचे दिसले आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
A special flight from Ukraine comprising Indian nationals including students lands in Delhi. Visuals from IGI Airport. #UkraineRussiaCrisis
Russia President Vladimir Putin this morning declared a 'military operation' in Ukraine. pic.twitter.com/Kl8PFGAD8v
— ANI (@ANI) February 24, 2022
युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एक निवेदन जारी करून रशियाने हल्ला केल्याचे म्हटले आहे. ‘रशिया शांतताप्रिय युक्रेनच्या लोकांवर हल्ला करत आहे, ज्याला आम्ही उत्तर देऊ आणि आम्ही जिंकू’, असं त्यांनी म्हटलं आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती खूपच तणावपूर्ण आहे. जगभरातील देशांकडून रशियाच्या या कृतीचा निषेध करण्यात येत आहे.