Saamana Editorial: ”कमळाबाईंचा आता मराठी दांडिया!” मांसाहारावरुनही भाजपवरती निशाणा
मुंबई: भारतीय जनता पार्टीच्यावतीनं मुंबईमध्ये ‘मराठी दांडिया’ कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. त्यावर आता सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. ”कमळाबाईचा आता मराठी दांडिया” असं म्हणत शिवसेनेनं भाजपला डिवचलं आहे. त्याचबरोबर जैन समाजानं मांसाहाराच्या जाहिरातीचा उठवलेल्या मुद्द्याला भाजप जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. ”‘दांडिये’ घुमवून मराठी माणसांची एकजूट फोडता येईल हा त्यांचा भ्रम” लालबाग, परळ, शिवडी […]
ADVERTISEMENT
मुंबई: भारतीय जनता पार्टीच्यावतीनं मुंबईमध्ये ‘मराठी दांडिया’ कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. त्यावर आता सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. ”कमळाबाईचा आता मराठी दांडिया” असं म्हणत शिवसेनेनं भाजपला डिवचलं आहे. त्याचबरोबर जैन समाजानं मांसाहाराच्या जाहिरातीचा उठवलेल्या मुद्द्याला भाजप जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
”‘दांडिये’ घुमवून मराठी माणसांची एकजूट फोडता येईल हा त्यांचा भ्रम”
लालबाग, परळ, शिवडी या शतप्रतिशत भगव्या प्रदेशात कमळाबाईने खास मराठी दांडियाचे आयोजन करून मराठी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालवला आहे. गणपती उत्सवानंतर नवरात्री उत्सवात भाजप आपल्या राजकीय टिपऱ्या अशा प्रकारे घुमवत आहे. अर्थात असे ‘दांडिये’ घुमवून मराठी माणसांची एकजूट फोडता येईल हा त्यांचा भ्रम आहे. मुंबईतील मराठी माणसांची एकजूट म्हणजे ‘मिंधे’ गटात सामील झालेल्या आमदारांची कमअस्सल अवलाद नाही.
लालबाग, परळ, माझगाव, शिवडी, दादर, भायखळा इतकेच काय, गिरगावपासून दहिसर-मुलुंडपर्यंतचा मुंबईतील प्रदेश सतत शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला व त्यात मराठीजनांबरोबर हिंदी, गुजराती, जैन, मारवाडी, मुस्लिम, दाक्षिणात्य असे ‘मुंबैकर’ बांधवही समर्थनार्थ उभे राहिले. असं सामानाच्या अग्रलेखात लिहिलं आहे.
हे वाचलं का?
”मांसाहारी खाद्य पदार्थांच्या जाहिराती पाहायच्या नसतील तर टी.व्ही. बंद करा”
मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातीवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी काही जैन संघटना उच्च न्यायालयात गेल्या, पण तेथे न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. मांसाहारी खाद्य पदार्थांच्या जाहिराती पाहायच्या नसतील तर टी.व्ही. बंद करा असा फटका न्यायालयाने मारला. त्यावरुन शिवसेनेने नरेंद्र मोदींवरती टीका केली आहे. ”आपले पंतप्रधान श्री. मोदी यांनी आठ मांसाहारी चित्ते नामीबियातून आणले व मध्य प्रदेशच्या जंगलात वाजत-गाजत सोडले.
ते चित्ते काय जंगलात दही-खिचडी, तूप-रोटी खाणार आहेत? मोदींचे सरकार त्यांना चांगला मांसाहार पुरवत आहेत. हा काय मांसाहार, हिंसाचार नाही? भाजपशासित राज्यांत गोमांस भक्षणाचा महापूर आला आहे आणि इथे मुंबईतील अनेक भागांतील हाऊसिंग सोसायटय़ांत मांसाहारी मंडळींना ‘घर’बंदी आहे. मांसाहार करणाऱ्यांना घर आणि प्रवेश नाकारला जातो. मात्र या मांसाहार करणाऱ्यांनीच संकटांचे घाव झेलून मुंबईचे व त्यातील शाकाहारी व्यापार मंडळाचे रक्षण केले असल्याच” सामनाच्या अग्रलेखात लिहिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT