अवघ्या काही तासात सचिन वाझेंची पुन्हा बदली, आता कुठे असणार वाझे?

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची अवघ्या काही तासात मुंबई पोलिसांच्या स्पेशल ब्रांचमध्ये बदली करण्यात आली आहे. आज (12 मार्च) सकाळी अशी माहिती देण्यात आली होती. सचिन वाझे हे मुंबईच्या नागरी सुविधा केंद्र विभागात यापुढे कार्यरत असणार आहेत. पण या गोष्टीला अवघे काही तास झाले नाहीत तोच त्यांची बदली स्पेशल ब्रांचमध्ये (SB 1) झाल्याचं वृत्त समोर आलं. (sachin vaze transferred to mumbai police special branch 1)

ADVERTISEMENT

थोड्या वेळापूर्वीच मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. ज्यानंतर वाझेंच्या नव्या बदलीचा निर्णय समोर आला. काल (11 मार्च) रात्री अशी माहिती समोर आली होती की, वाझेंची बदली ही नागरी सुविधा केंद्रात करण्यात आली आहे. पण आज सकाळच्या बैठकीनंतर सचिन वाझे यांची स्पेशल ब्रांचमध्ये नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्पेशल ब्रांच नेमकं काय काम करतं?

हे वाचलं का?

मुंबई पोलिसांची SB 1 म्हणजे विशेष शाखा. या विशेष शाखेचं काम हे स्थानिक पातळीवरील गुप्त माहिती गोळा करणं ही आहे.

जेव्हा-जेव्हा मुंबईमध्ये कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम, मेळावे किंवा काही महत्त्वाचे इव्हेंट होत असतात तेव्हा-तेव्हा मुंबई पोलिसांची हीच विशेष शाखा यासंबंधी काही गुप्त माहिती गोळा करुन त्याविषयी योग्य तो अहवाल तयार करतं. जो अहवाल नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडला आहे.

ADVERTISEMENT

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणानंतर अडचणीत आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची क्राईम ब्रांचमधून बदली करुन त्यांना मुंबईच्या नागरी सुविधा केंद्र विभागात (Citizen Facilitation Center department of Mumbai) पाठवण्यात आलं होतं. (sachin vaze transferred to citizen facilitation center department of mumbai)

ADVERTISEMENT

काल (11 मार्च) रात्री उशिरा यासंदर्भात पोलीस मुख्यालयातून याबाबतचा निर्णय झाला होता. त्यामुळे त्यांची सीआययू युनिटमधून थेट नागरी सुविधा केंद्र विभागात बदली झाली होती. तसेच त्यांना ताबडतोब पदभार स्वीकारण्याचे आदेशही देण्यात आले होते.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात विरोधकांनी सचिन वझेंवर गंभीर आरोप केले होते. तसेच त्यांच्या अटकेची मागणी देखील केली होती. मात्र, त्यांची क्राईम ब्रांचमधून बदली करण्यात येईल असं आश्वासन खुद्द गृहमंत्र्यांनी दिलं होतं.

‘…म्हणून सचिन वाझेंची बदली केली’, अजितदादांनी सांगितलं खरं कारण!

मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनीच केली असावी असा संशय विमला हिरेन यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर सचिन वाझे यांची क्राईम ब्रांचमधून बदली करण्यात येईल असं सरकारकडून विधीमंडळात जाहीर करण्यात आलं होतं.

याप्रकरणी विरोधकांनी प्रचंड दबाव आणल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.

वाझे हे क्राईम ब्रांचमध्ये एपीआय पदावर कार्यरत होते. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझे हे आपल्या पदाचा गैरवापर करुन पुरावे नष्ट करू शकतात. त्यामुळे त्यांना निलंबित करुन अटक करावी अशीच मागणी विरोधकांनी केली होती. यावरुन 9 मार्चला विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला होता. दिवसभरात अनेकदा सभागृहाचं कामकाज देखील तहकूब करावं लागलं होतं.

वाझेंची बदली न केल्यास सभागृहाचं कामकाज चालू देणार नसल्याचं विरोधकांनी सांगितलं होतं. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन सरकारने वाझे यांची बदली करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT