‘साधू हत्याकांड आमच्या राज्यात होणार नाही’, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला
Eknath Shinde criticize Uddhav Thackeray : साधू हत्याकांड आमच्या राज्य़ात होणार नाही, असे विधान करून त्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पालघरमध्ये साधू हत्याकांड घडले होते.
ADVERTISEMENT
Eknath Shinde criticize Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी ते आमदार खासदारांसह लखनऊमध्ये दाखल झाले होते. यावेळी लखनऊ एअरपोर्टवर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. लखनऊ एअरपोर्टवर पोहोचताच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री बनून अयोध्येत आल्यामुळे आनंद वाटतोय अशी भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच आपल्यामुळे घरात बसलेले आता बाहेर पडायला लागलेत अशी टीका शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार खासदारांसह अयोध्येत पोहोचले आहेत. युपीचे मंत्री स्वतंत्रदेव सिंह यांनी लखनऊ विमान तळावर त्यांचे जंगी स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जंगी तयारी केली होती. ढोल-ताशाच्या गजरात मुख्यमंत्र्याचे स्वागत करण्यात आले. या स्वागताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील भारावून गेले होते. पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी मुख्यमंत्री योगी यांनी केलेल्या तयारीचे कौतूक केले.
अयोध्या आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. तसेच अयोध्या आमच्यासाठी भावना, भक्ती, अस्मिता असल्याचे उद्गार एकनाथ शिंदे यांनी लखनऊमध्ये काढले आहेत. राज्यात शिवसेना-भाजप मजबूतीने विकासाच काम करतंय. साधू हत्याकांड आमच्या राज्य़ात होणार नाही, असे विधान करून त्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पालघरमध्ये साधू हत्याकांड घडले होते. तसेच राज्यात विकासाची कामे करणार असून या कामातून टीकाकारांना उत्तर देणार असल्याचेही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
आपण गेल्या सात ते आठ महिन्यात जनतेसाठी मोठे निर्णय घेतले आहेत. आपण चांगले निर्णय़ घेतल्याने विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे पुर्वी कुठे दिसत नव्हते ते आता रस्त्यावर येऊ लागले आहेत. काही लोकं बरे देखील झाले आहेत असे नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT