आशा स्वयंसेविकांच्या आंदोलनाला यश, १ जुलैपासून पगारात वाढ
राज्यातील आशा स्वयंसेविकांना १ जुलै पासून मासिक वेतनात १ हजार रुपये निश्चीत मानधन आणि ५०० रुपये कोविड भत्ता अशी १५०० रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मंत्रालयात कृती समितीच्या बैठकीत याबद्दल निर्णय घेतला. याचसोबत आशा स्वयंसेविकांना विशेष भेट म्हणून स्मार्टफोन देण्यात येणार असल्याचंही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. सरकारी आश्वासनानंतर राज्यभरातील आशा […]
ADVERTISEMENT
राज्यातील आशा स्वयंसेविकांना १ जुलै पासून मासिक वेतनात १ हजार रुपये निश्चीत मानधन आणि ५०० रुपये कोविड भत्ता अशी १५०० रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मंत्रालयात कृती समितीच्या बैठकीत याबद्दल निर्णय घेतला. याचसोबत आशा स्वयंसेविकांना विशेष भेट म्हणून स्मार्टफोन देण्यात येणार असल्याचंही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
सरकारी आश्वासनानंतर राज्यभरातील आशा स्वयंसेवक आणि गट प्रवर्तकांचा संप मागे घेण्यात आल्याची घोषणा कृती समितीचे अध्यक्ष एम.के.पाटील यांनी दिली. उद्यापासून सर्व आशा स्वयंसेविका आपल्या कामावर हजर राहतील अशीही माहिती पाटील यांनी दिली. सुमारे आठवडाभरापूर्वी पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील आशा स्वयंसेविकांनी संप पुकारला होता. सरकारने घेतलेल्या पगारवाढीच्या निर्णयाचा राज्यातील ६८ हजार २९७ आशा स्वयंसेविका आणि ३ हजार ५७० गट प्रवर्तकांना लाभ मिळणार आहे.
बैठकीत झालेल्या चर्चेबाबत सविस्तर माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, “आशा सेविकांच्या संपाबाबत तीन बैठका घेतल्या. यावेळी झालेल्या चर्चेअंती आशा सेविकांना १ जुलै २०२१ पासून अचूक संकलन व सादरीकरणासाठी १ हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. गट प्रवर्तकांना १२०० रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता असे एकूण १७०० रुपयांची वाढ मिळणार असून त्यासाठी राज्य शासन प्रतिवर्ष २०२ कोटी रुपये खर्च करणार आहे.”
हे वाचलं का?
“आशांना स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे प्रोत्साहन भत्ता दिला जातो. आर्थिक परिस्थितीनुसार हा भत्ता देण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना शिफारस केली जाईल. कोरोनावरील लसीकरणासाठी गर्दीचे व्यवस्थापन करण्याकरिता आशांना 200 रुपये अतिरिक्त भत्ता दिला जाईल. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयात आशांकरिता ‘निवारा केंद्र’ उपलब्ध करुन देण्याबाबत यंत्रणेला सूचना देण्यात येतील,” असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT