सलमान खानची भाची अलीजेह करत आहे बॉलीवूडमध्ये डेब्यू; पुतण्या अरहानही लागला कामाला

मुंबई तक

सलमान खानची भाची लवकरच इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. पण ती कोणत्या चित्रपटातून एन्ट्री करण्याचे ठरवतेय, याचाही खुलासा आज झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सलमानची लाडकी भाची अलिझेह अग्निहोत्रीने दिग्दर्शक विकास बहलचा चित्रपट साइन केला आहे. सलमानच्या कुटुंबातील पुढची पिढी सज्ज सलमान त्याच्या चित्रपटांमधून अनेक नव्या प्रतिभांना संधी देत ​​आहे. सलमान खान नेहमीच लोकांच्या हृदयावर राज्य करत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सलमान खानची भाची लवकरच इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. पण ती कोणत्या चित्रपटातून एन्ट्री करण्याचे ठरवतेय, याचाही खुलासा आज झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सलमानची लाडकी भाची अलिझेह अग्निहोत्रीने दिग्दर्शक विकास बहलचा चित्रपट साइन केला आहे.

सलमानच्या कुटुंबातील पुढची पिढी सज्ज

सलमान त्याच्या चित्रपटांमधून अनेक नव्या प्रतिभांना संधी देत ​​आहे. सलमान खान नेहमीच लोकांच्या हृदयावर राज्य करत आलाय, पण आता सलमानच्या कुटुंबातील पुढची पिढीही बॉलिवूडवर राज्य करण्याचा विचार करत आहे. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान लवकरच होम प्रोडक्शनच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दुसरीकडे, अलविरा आणि अतुल अग्निहोत्री यांची मुलगी अलिझेह देखील चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय कौशल्य दाखवणार आहे.

दिग्दर्शक विकास बहलच्या सिनेमाची केली निवड

दिग्दर्शक विकास बहलचा गुडबाय हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अयशस्वी ठरला असला तरी त्याचा विकासच्या कामावर कोणताही परिणाम झालेला नाही. ‘गुडबाय’ चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत रश्मिका मंदान्ना, नीना गुप्ता यांसारख्या स्टारकास्टचे दिग्दर्शन करणाऱ्या विकास बहलने नुकतेच ‘गणपत’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यानंतर विकास फ्रेंच चित्रपटाच्या हिंदी रिमेकच्या शूटिंगची तयारी करत आहे.

फ्रेंच चित्रपटाचा हिंदी रिमेक

Peepingmoon.com च्या खास बातमीनुसार, विकास बहल आता 2014 च्या फ्रेंच-बेल्जियन चित्रपटला फॅमिली बेलियरचा हिंदी रिमेक बनवणार आहे. हा चित्रपट येत्या पिढीतील कॉमेडी ड्रामा चित्रपट असेल. ज्यामध्ये अलिझेह एका मूकबधिर कुटुंबातील 16 वर्षांच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. विकासने चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण केली आहे, असं बोललं जात आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातीला या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. विकास गेल्या 6 वर्षांपासून या चित्रपटाची तयारी करत होता. दिग्दर्शकानेही हिंदी प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून आवश्यक ते बदल केले आहेत. अलीझेहचे वडील अतुल अग्निहोत्री रिलायन्स एंटरटेनमेंटच्या सहकार्याने या विकासच्या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp