संभाजीराजे छत्रपती यांनी उस्मानाबादमध्ये केली नुकसानीची पाहणी, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गणेश जाधव, प्रतिनिधी, उस्मानाबाद

सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे सरसकट मदत दिली पाहिजे त्यासाठी कॅबिनेट बैठक घ्यायला हवी, पहिली जबाबदारी राज्याकडून अपेक्षित , केंद्र सरकारकडे मागणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करून जास्तीत जास्त मागणी करून गरीब शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी उस्मानाबादमध्ये केली आहे.

खासदार छत्रपती संभाजीराजे महाराज यांनी भर पावसात उस्मानाबाद जिल्ह्यातील रामवाडी येथे अतिवृष्टी नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संभाजी महाराज शेतकऱ्यांच्या बांधावर आले असून मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मराठवाड्यात पाऊस कमी असतो. मात्र आता अतिवृष्टी झाल्यामुळे महाभयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची वाईट स्थिती झाल्याने सरकारने ताबडतोब NDRF च्या माध्यमातून सरसकट मदत करावी यासाठी लक्ष केंद्रित करावे , मागील वर्षी विमा पैसे मिळाले नाही. विमा कंपन्यांनी ग्रामसेवक यांचे अहवाल ग्राह्य धरले पाहिजेत. असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

गुन्हा दाखल करायचाच असेल, तर माझ्यावर करा!; छत्रपती संभाजीराजे भडकले

ADVERTISEMENT

सरकारने यात लक्ष देऊन मराठवाड्यात सरसकट मदत युद्धपातळीवर करणे गरजेचे आहे, शेतीत पिकलेल्या सोयाबीनचा कुजून वास येत आहे. इतर विषय बाजूला ठेवून सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे केवळ मंत्री दौरे करून भागणार नाही सरकारी बाबूंनी मदत लवकर करावी अशी मागणी केली.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील,रोहित पडवळ,विष्णू इंगळे,आकाश मुंडे,दाऊतपुरचे सरपंच बंकट शिंदे, मोहसीन पठाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT