नवाब मलिक यांनी दिलेल्या ‘त्या’ पत्राची समीर वानखेडेंनी उडवली खिल्ली, म्हणाले…
नवाब मलिक यांनी आज निनावी पत्र समोर आणलं आहे. हे पत्र आपल्याला एनसीबीतल्याच एका अधिकाऱ्याने लिहिलं आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर लिहिलं आहे असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. याद्वारे त्यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. समीर वानखेडे लोकांच्या घरात ड्रग्ज प्लांट करत असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. […]
ADVERTISEMENT

नवाब मलिक यांनी आज निनावी पत्र समोर आणलं आहे. हे पत्र आपल्याला एनसीबीतल्याच एका अधिकाऱ्याने लिहिलं आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर लिहिलं आहे असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. याद्वारे त्यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. समीर वानखेडे लोकांच्या घरात ड्रग्ज प्लांट करत असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मात्र आता या प्रकरणी समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हटलं आहे समीर वानखेडे यांनी?
नवाब मलिक यांनी समोर आणलेलं पत्र म्हणजे मोठा जोक आहे. त्यातले सगळे आरोप निराधार, बिनबुडाचे आणि निखालस खोटे आहेत. त्यामुळे याबाबत मी काय प्रतिक्रिया देणार? जे मी केलंच नाही जे अकारण मला बदनाम करण्यासाठी केलं जातं आहे त्याबाबत काय भाष्य करणार असं म्हणत समीर वानखेडे यांनी या पत्राची खिल्ली उडवली आहे.
राष्ट्रवाद काँग्रसेचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत. मात्र हे सगळे आरोप खोटे असल्याचं आता समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.










