संदीप देशपांडेंवर हल्ला करणारे कोण? पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती
Sandeep Deshpande : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हल्ला करण्यात आला. या प्रकरणात वेगवेगळे आरोप होत असताना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन जणांना ताब्यात घेतलं असून, अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी महत्त्वाची माहिती दिली. (sandeep deshpande attack, police arrested two suspected person) मनसे […]
ADVERTISEMENT
Sandeep Deshpande : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हल्ला करण्यात आला. या प्रकरणात वेगवेगळे आरोप होत असताना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन जणांना ताब्यात घेतलं असून, अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी महत्त्वाची माहिती दिली. (sandeep deshpande attack, police arrested two suspected person)
ADVERTISEMENT
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास सध्या मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर सकाळी सव्वासात ते साडेसातच्या दरम्यान शिवाजी पार्क येथे काही अज्ञात आरोपींनी काही अज्ञात कारणांवरून हल्ला केला होता. गुन्हे शाखा पोलिसांची आठ पथकं तयार करण्यात आली होती.
एसीपी प्रशांत कदम आणि त्यांच्या टीमने सीसीटीव्ही फुटेज आणि माहितीच्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हे वाचलं का?
संदीप देशपांडे हल्ला: दोघांना भांडूपमधून घेतलं ताब्यात, नेमकं कनेक्शन काय?
आरोपींनी कुठून ताब्यात घेण्यात आलं आणि ते कुणाशी संबधित आहेत?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका आरोपीचं वय 56 वर्ष आहे. त्याला भाडुंप परिसरातून साथीदारासह अटक करण्यात आली. हा आरोपी महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेना याचा उपाध्यक्ष आहे. त्यांनी गुन्ह्याची प्राथमिक कबूली दिली आहे. परंतु यामागचा उद्देश आहे, तो व्यावसायिक आहे, राजकीय आहे, सामाजिक आहे की, आर्थिक… या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
ADVERTISEMENT
या गुन्ह्यांचा तपास क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासत असून, त्यानुषंगाने पुढील कारवाई करत आहोत. या बाबतीत आम्ही अधिक तपास करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
‘सरपटणारा प्राणी, कॉण्ट्रक्ट किलर..’ निवडणूक आयोगासह मोदी-शाहांवर घणाघात
ADVERTISEMENT
गुन्ह्यात आणखी लोकांचा समावेश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी या प्रकरणात आणखी लोकांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना दिली. आणखी दोघं या प्रकरणात आहेत. त्यांचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे. त्यांच्या व्यतिरिक्तही या गुन्ह्याच्या कटात कुणी असेल, तर त्याचाही शोध घेतला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
माथाडी कामगार सेनेशी ज्याचा संबंध आहे, त्याची पार्श्वभूमीवर गुन्हेगारी स्वरुपाची आहे. इतरांची पार्श्वभूमी पोलिसांकडून तपासली जात आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT