Sangli: एकाच हॉस्पिटलमधील 205 कोरोना रुग्णांपैकी 89 रुग्णांचा मृत्यू, पळून जाणाऱ्या डॉक्टरला अटक
स्वाती चिखलीकर सांगली: कोरोना (Corona) संसर्गादरम्यान सदोष उपचाराच्या आरोपावरुन सांगली (Sangli) जिल्ह्यात प्रथमच डॉक्टरला (Doctor) अटक करण्यात आली आहे. अॅपेक्स केअर हॉस्पिटल येथे कोरोनाचे 205 रुग्ण दाखल होते. ज्यापैकी तब्बल 89 रुग्णांचा मृत्यू (89 patents died) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे याला दवाखाना म्हणावा की, कत्तलखाना असा सवाल सांगलीतील नागरिक विचारत आहेत. सांगलीच्या […]
ADVERTISEMENT
स्वाती चिखलीकर
ADVERTISEMENT
सांगली: कोरोना (Corona) संसर्गादरम्यान सदोष उपचाराच्या आरोपावरुन सांगली (Sangli) जिल्ह्यात प्रथमच डॉक्टरला (Doctor) अटक करण्यात आली आहे. अॅपेक्स केअर हॉस्पिटल येथे कोरोनाचे 205 रुग्ण दाखल होते. ज्यापैकी तब्बल 89 रुग्णांचा मृत्यू (89 patents died) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे याला दवाखाना म्हणावा की, कत्तलखाना असा सवाल सांगलीतील नागरिक विचारत आहेत.
सांगलीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पळून जाणाऱ्या डॉ. महेश जाधवला अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
हे वाचलं का?
कोविड साथीदरम्यान सदोष उपचाराच्या आरोपावरुन सांगली जिल्ह्यात प्रथमच डॉक्टरला अटक झाली आहे. अॅपेक्स केअर हॉस्पिटलमध्ये 205 रुग्ण दाखल होते. त्यापैकी 89 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. डॉक्टरवर कारवाई झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
Pune Bogus Doctor: कम्पाउंडरने ‘असं’ सुरु केलं होतं स्वत:चं हॉस्पिटल, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
ADVERTISEMENT
मिरजेतील अॅपेक्स केअर हॉस्पिटलचे डॉ. महेश जाधव याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे. कोरोना साथीदरम्यान सदोष उपचाराच्या आरोपावरुन जिल्ह्यात प्रथमच एखाद्या डॉक्टरला अटक करण्याची घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
मिरजेतील अॅपेक्स कोव्हिड रुग्णालयात पुरेशी यंत्रसामुग्री नसतानाही दोन महिन्यात 205 रुग्ण दाखल करुन घेण्यात आले होते. यापैकी 89 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. रुग्णालयातील उपचाराबाबत व बिल आकारणीबाबत तक्रारीमुळे महापालिका प्रशासनाने रुग्णांवर उपचार करण्यास बंदी घातल्यानंतरही डॉ. महेश जाधव याने नवीन रुग्ण दाखल करुन घेतल्याचे महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाच्या तपासणीत निष्पन्न झाले.
याबाबत महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे यांनी महेश जाधव याच्याविरुद्ध गांधी चौक पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ. जाधव याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करुन डॉ. जाधव याला मदत करणार्या इतर सात जणांवरही गुन्हा दाखल करुन एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
खरं आणि बनावट रेमडेसिवीर कसं ओळखाल? ‘या’ टिप्स नक्की उपयोगात येतील!
अॅपेक्स रुग्णालयात उपचार घेणार्या 205 रुग्णांपैकी तब्बल 89 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने उपचारात हलगर्जीपणा व रुग्णांच्या मृतास कारणीभूत असल्याबद्दल डॉ. जाधव याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
रुग्णालयात व्हेंटीलेटर आणि ऑक्सीजनचा पुरेसा साठा नसतानाही हे कोव्हिड रुग्णालय सुरू करण्यात आले होते. उपचारासाठी तज्ज्ञ वैद्यकीय पथकाऐवजी होमिओपॅथीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांकडून रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचीही माहिती आता समोर आली आहे.
तसेच उपचारासाठी भरमसाठ रकमेची आकारणी करून बिले देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT