संजय राठोड पोहरादेवीत, समर्थकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मागील १५ दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले संजय राठोड हे आज पोहरादेवी या ठिकाणी आले. पोहरादेवी हे ठिकाणा बंजारा समाजासाठी काशीसारखंच मानलं जातं या ठिकाणी दाखल होत संजय राठोड यांनी सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. या ठिकाणी संजय राठोड यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. ही गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाली होती की सोशल डिस्टन्सिंगचा, कोरोना प्रतिबंधक नियमांचा पूर्णपणे फज्जा उडाला. तसंच गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला.

ADVERTISEMENT

पूजा चव्हाण या टिकटॉक स्टारने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली त्यानंतर दोन आठवडे संजय राठोड हे नॉट रिचेबल होते. पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. यातला आवाज हा संजय राठोड यांचा आहे असा आरोप भाजपने केला आणि त्यांचा राजीनामा मागण्यास सुरूवात केली. तसंच संजय राठोड हे गायब का आहेत, नॉट रिचेबल का आहेत असाही प्रश्न विचारण्यास सुरूवात केली होती. आज संजय राठोड हे प्रसारमाध्यमांच्या समोर आले. मात्र यावेळेस त्यांचे हजारो समर्थक त्या ठिकाणी हजर होते.

बीडमधल्या परळीची असलेल्या पूजा चव्हाण या २२ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. इंग्लिश स्पिकिंगच्या क्लाससाठी ती पुण्यात आली होती. तिच्या आत्महत्येनंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी तिचे संबंध असल्याची चर्चा सुरू झाली. याचं महत्त्वाचं कारण ते म्हणजे व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्स. बारा क्लिप्स व्हायरल झाल्या, त्यानंतर या क्लिप्समध्ये असलेला एक आवाज हा संजय राठोड यांचा आहे असाही आरोप भाजपने केला आहे. त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली. चित्रा वाघ यांनीही संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले. आता या सगळ्या प्रकरणी संजय राठोड यांनी पंधरा दिवसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT