Video : लेकीच्या संगीत कार्यक्रमात सुप्रिया सुळेंसोबत संजय राऊतांचा भन्नाट डान्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून गेली दोन वर्ष सातत्याने शिवसेनेकडून संजय राऊत हे सरकारचा किल्ला लढवत आहेत. विरोधकांवर आपल्या खास शैलीत टीका करणं असो किंवा सरकाराची बाजू मांडणं असो प्रत्येक गोष्टीत संजय राऊत आपली बाजू ठामपणे मांडत आहेत. परंतू बऱ्याच कालावधीनंतर राजकीय धामधुमीत संजय राऊतांचा एक वेगळा आणि दिलखुलास अंदाज सर्वांना दिसून आला आहे.

ADVERTISEMENT

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊतचं सोमवारी २९ नोव्हेंबरला लग्न होणार आहे. मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात त्यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरला. दोघांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी ही सोमवारी विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार नार्वेकर याच्याशी पुर्वशीचा विवाह होणार आहे. लग्नाआधी आयोजित संगीत कार्यक्रमात अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती, ज्यात संजय राऊतांनी सुप्रिया सुळेंसोबत डान्स केला.

हे वाचलं का?

सुप्रिया सुळेंनी संजय राऊतांसोबत डान्स केल्यानंतर त्यांच्या पत्नी वर्षा राऊतही तिकडे हजर होत्या. सुप्रिया सुळेंनी आग्रह केल्यानंतर त्यांनीदेखील डान्स करत आनंद लुटला. एकहा माहोल तयार झाल्यानंतर वधू आणि वर पक्षातल्या सर्व पाहुण्यांनी मग बॉलिवूड संगीतावर ठेका धरला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT