Adani Group: 2014ची ती कविता अन्…, मोदींना संजय राऊतांनी दाखवला आरसा
Sanjay Raut Rokhthok On PM Modi’s parliament speech : “अदानी (Adani) यांच्या खिशात पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी संपूर्ण देश घातला. मोदी यांनी अदानी यांना देश विकला”, असं म्हणत संजय राऊतांनी (Sanjay Raut) थेट नरेंद्र मोदींवरच हल्ला चढवला. संजय राऊतांनी रोखठोकमध्ये (Rokhthok) राहुल गांधींचं संसेदतील भाषणाबद्दल कौतुक करताना मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. काँग्रेसचे नेते […]
ADVERTISEMENT

Sanjay Raut Rokhthok On PM Modi’s parliament speech : “अदानी (Adani) यांच्या खिशात पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी संपूर्ण देश घातला. मोदी यांनी अदानी यांना देश विकला”, असं म्हणत संजय राऊतांनी (Sanjay Raut) थेट नरेंद्र मोदींवरच हल्ला चढवला. संजय राऊतांनी रोखठोकमध्ये (Rokhthok) राहुल गांधींचं संसेदतील भाषणाबद्दल कौतुक करताना मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात गौतम अदानी यांच्या विस्तारत चाललेल्या उद्योगाबद्दलचा मुद्दा उपस्थित करत काही प्रश्न मोदींना विचारले होते. त्यावर मोदींनी बोलणं टाळलं. यावरुनच राऊतांनी मोदींना 2014 ची कवितेची आठवण करून देत आरसा दाखवला आहे.
‘ही कविता वाचण्याची वेळ आली’, संजय राऊतांनी रोखठोकमध्ये काय म्हटलंय?
रोखठोकमध्ये संजय राऊत म्हणतात, “अदानी यांच्या खिशात पंतप्रधान श्री. मोदी यांनी संपूर्ण देश घातला. मोदी यांनी अदानी यांना देश विकला, असे विरोधकांचे म्हणणे आहे. भाजप व अर्थमंत्री अदानी यांची वकिली करताना दिसतात हे आश्चर्य आहे. श्री. मोदी व त्यांचा पक्ष विरोधी पक्षात असताना काँग्रेस आणि गांधी परिवार देश विकत असल्याचा आरोप भाजप करीत होता व त्यात नरेंद्र मोदी आघाडीवर होते. त्या वेळी जाहीरसभांतून गांधी परिवार व काँग्रेसविरोधात तोफा डागताना मोदी एक कविता तालासुरात वाचत. ती कविता अशी-
वे लूट रहे है सपनों को









