पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे संजय राऊतांचा हात असण्याची शक्यता – प्रवीण दरेकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. एकीकडे महाविकास आघाडीतले घटकपक्ष या हल्ल्यासाठी भाजपला दोषी धरत असतानाच विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे संजय राऊतांचा हात असेल अशी शंका घ्यायला वाव […]
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. एकीकडे महाविकास आघाडीतले घटकपक्ष या हल्ल्यासाठी भाजपला दोषी धरत असतानाच विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे संजय राऊतांचा हात असेल अशी शंका घ्यायला वाव असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले, ते सांगली दौऱ्यात बोलत होते.
“मला तर असा संशय आहे की संजय राऊत यांनीच नियोजनबद्ध पद्धतीने केलेला हा कार्यक्रम आहे की काय? यामागे संजय राऊतांचाच हात असावा अशी शंका घ्यायला वाव आहे. त्यांच्यावर सुरु असलेल्या कारवाईवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी हा प्रकार झाला असू शकतो. पोलिसांनी त्यादृष्टीने चौकशी करावी”, असं दरेकर म्हणाले.
हे वाचलं का?
सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण : कॅमेरे पोहचले , मग पोलीस काय करत होते? -फडणवीस
एसटी कर्मचारी शरद पवारांच्या घरावर जाणार आहेत हे मीडियाला कळतं, मीडिया तिकडे जाऊन उभा राहतो…परंतू पोलिसांना याची माहिती कळत नाही. पोलीस यावेळी झोपा काढत होते का? हा पूर्णपणे इंटलिजन्स फेल्युअर आहे. त्या विभागाला अद्याप डीसीपी मिळालेला नाही. जी लोकं आपल्याच नेत्याचं संरक्षण करु शकत नाही त्यांनी महाराष्ट्राच्या हिताच्या आणि सुरक्षेच्या गोष्टी करु नयेत, असं म्हणत दरेकरांनी राज्य सरकारला टोला लगावला.
ADVERTISEMENT
…मग ‘ही’ महाराष्ट्राची संस्कृती आहे का?; महाविकास आघाडीला भाजपचा उलट सवाल
ADVERTISEMENT
सरकारने या प्रकरणाच्या खोलाशी जाणं गरजेचं आहे. फक्त विरोधकांवर बोट दाखवून फायदा होणार नाही. आपलेही कोणी हितशत्रू आहेत का हे तपासावं लागेल असं दरेकर म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT