ममतांच्या भेटीनंतर संजय राऊतांनी राहुल गांधींना दिला सल्ला; दिल्लीतील भेटीत काय झालं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर येऊन गेल्यानंतर आज शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. राऊत यांनी अचानक राहुल गांधींची भेट घेतल्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. या भेटीनंतर राऊत यांनी विरोधकांच्या एकाच आघाडीबद्दल भूमिका मांडली.

ADVERTISEMENT

राहुल गांधी यांच्या भेटीनंतर माध्यमांशी विरोधकांच्या आघाडीबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘यासंदर्भात चर्चा व्हायला हवी. सगळ्यांनीही चर्चा करायला हवी. विरोधकांची जर कुठली आघाडी बनत असेल, तर ती काँग्रेसशिवाय शक्य नाही, असं आम्ही आधीच म्हणालो आहे. यासंदर्भात आमची चर्चा झाली आहे. राहुल गांधी मुंबईत येणार आहेत. त्याचा कार्यक्रम तयार होत असून, याबद्दल आताच बोलणं योग्य ठरणार नाही. यासंदर्भात आता उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे. त्यानंतर उद्या बोलेन’, असं राऊत म्हणाले.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची अवस्था टायटॅनिकसारखी-नारायण राणे

हे वाचलं का?

‘विरोधकांची आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी राहुल गांधीनाही बोललो आहे की, त्यांनी नेतृत्व करायला हवं. पुढे येऊन काम करायला हवं असं राहुल गांधींना बोललो. काँग्रेसशिवाय आघाडी होऊ शकत नाही. जर कुणी अशा पद्धतीने आघाडी बनवत असेल, तर काँग्रेसपण आघाडीच करेल. त्यांच्यासोबतही बरेच पक्ष आहेत. अशा वेळी विरोधकांच्या तीन आघाड्या काय करणार आहे. मुद्दा फक्त उत्तर प्रदेश निवडणुकीचा नाही, तर राष्ट्रीय निवडणुकीचा आहे. विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व कुणी करावं, याबद्दल मी कुणाचं नाव घेतलेलं नाही. विरोधकांची एकच आघाडी हवी’, अशी भूमिका राऊत यांनी मांडली.

आदित्य ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्या ‘त्या’ भेटीत काय घडलं?; राऊतांनी ‘रोखठोक’मधून उत्तर

ADVERTISEMENT

‘आम्ही आमच्या भूमिकेवर कायम आहे. एकच आघाडी बनायला हवी. विरोधकांची एकच आघाडी बनली तर आघाडी अधिक सक्षम असेल. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार आहेत. मोठे नेते आहेत,’ असं संजय राऊत म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT