पुढची पत्रकार परिषद सेना भवनमध्ये,मुंबईत शिवसेनाच दादा आहे विसरू नका-संजय राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज लेटरबॉम्ब टाकला आहे. यात त्यांनी मुख्य दोन आरोप केले आहेत. पहिला आरोप आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी धमकी देण्यात आली. तर दुसरा आरोप आहे तो म्हणजे तपास यंत्रणांचा होणारा गैरवापर. यानंतर त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलतानाही हे सगळे आरोप केले. यासंदर्भातलं पत्र त्यांनी उपरराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून लिहिलं आहे.त्यानंतर दिल्लीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना पुढची पत्रकार परिषद सेना भवन आणि त्यापुढची ईडी कार्यालयासमोर घेतली जाणार असं म्हटलं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच मुंबईत शिवसेनाच दादा आहे हे कुणी विसरू नये असंही म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

‘ईडीसारख्या तपासयंत्रणांचा भाजपकडून गैरवापर’ संजय राऊत यांची उपराष्ट्रपतींकडे तक्रार

काय म्हणाले आहेत संजय राऊत?

हे वाचलं का?

‘ईडीच्या ऑफिसमध्ये बेकायदा कोण जाऊन बसतं? जी लोकं ऑफिसमध्ये जातात ती ईडीला ब्रीफ करतात. ईडीला आदेश देतात. कोणाला टॉर्चर करायचं हे सांगतात. मी देवेंद्र फडणवीसांना आव्हान करतो आहे आणि त्यांना कळलं असणारच मी काय म्हणतो आहे ते. महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. माझ्या मुलीच्या लग्नात फुलांचं डेकोरेशन करणाऱ्या माणसाला ईडीने उचललं. त्याला विचारलं तुला किती पैसे मिळाले. तो म्हणाला की मी संजय राऊत यांच्या मुलीला लहानाचं मोठं होताना पाहिलं आहे. मी तिच्या लग्नात डेकोरेशनसाठी पैसे घेतले नाहीत तेव्हा त्याच्या डोक्यावर बंदुक ठेवण्यात आली.’ हे सगळं कोण करतंय हे मी लवकरच जाहीर करणार आहे त्यासाठी पुढची पत्रकार परिषद सेना भवन आणि त्यापुढची ईडी कार्यालयासमोर घेतली जाणार आहे असं संजय राऊत यांनी जाहीर केलं आहे. एवढंच नाही तर मुंबईत शिवसेनाच दादा आहे हे विसरू नका असंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

ठाकरे सरकार पाडण्यासाठी धमकी देण्यात आली होती, संजय राऊतांच्या ‘लेटरबॉम्ब’ने खळबळ

ADVERTISEMENT

आणखी काय म्हणाले संजय राऊत?

ADVERTISEMENT

सगळ्यात जास्त ईडीचे खटले महाराष्ट्रातच कसे काय? बिहार आणि यूपी, दिल्लीत कसे नाहीत? तर हे सारे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्राचे षडयंत्र सुरू आहे. आणीबाणीत ते तुरुगांत होते. ते जेलमध्ये गेलेत आणि कालच मोदी यांनी राज्यसभेत आणीबाणीतल्या दमनशाहीची आठवण करून दिली. कशा प्रकारे सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधकांचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सरकार तर आणीबाणीपेक्षाही भयंकर प्रकारे सरकारी यंत्रणांचा वापर करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

आज लिहिलेल्या पत्रानंतर मला जवळपास सगळ्याच राज्यातील विरोधी पक्षनेत्यांचे फोन आले. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून खोटेनाटे आरोप करायचे, त्यांना बदनाम करायचे. ते भ्रमात आहेत. मात्र, आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही. राष्ट्रीय एजन्सी असलेल्या ईडी आणि इतर एजन्सी या भाजपच्या किंवा त्यांच्या मालकांच्या क्रिमिनल सेंडिमेंटचा भाग आहेत. हा ट्रेलरही नाही. ट्रेलर अजून यायचाय. कशा प्रकारे हे क्रिमिनल सेंडिकेट चालवतात, कसं ब्लॅकमेल करतात, कसं मनी लॉड्रिंग करतात हे पुराव्यानिशी दाखवू, असा इशाराच संजय राऊत यांनी दिल्लीत दिला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT