Sanjay Raut: “फडणवीसांनी उपचार करून घेतले पाहिजेत”, मोदी-शाहांनाही डिवचलं

मुंबई तक

Sanjay Raut। Devendra Fadnavis । Sharad Pawar : 2019 मध्ये अजित पवारांसोबत झालेला शपथविधी हा शरद पवारांशी चर्चा करून झाला होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनी यावरून देवेंद्र फडणवीसांना उपचार घेण्याचा सल्ला दिलाय. राऊतांनी नववे आश्चर्य म्हणणं मोदी-शाहांनाही डिवचलं आहे. (Sanjay Raut Reaction […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Sanjay Raut। Devendra Fadnavis । Sharad Pawar : 2019 मध्ये अजित पवारांसोबत झालेला शपथविधी हा शरद पवारांशी चर्चा करून झाला होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनी यावरून देवेंद्र फडणवीसांना उपचार घेण्याचा सल्ला दिलाय. राऊतांनी नववे आश्चर्य म्हणणं मोदी-शाहांनाही डिवचलं आहे. (Sanjay Raut Reaction On Devendra Fadnavis statement)

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “शरद पवारांशी बोलून जर तो शपथविधी झाला असता, तर नक्कीच ते सरकार चाललं असतं. ते सरकार 72 तासांत कोसळलं नसतं. देवेंद्र फडणवीसांविषयी मी काय बोलू? अलिकडे मी त्यांची वक्तव्य पाहतोय. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाची प्रमुख लोक… देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावे आश्चर्य आहेत. आधीची आठ आश्चर्य जगात आहेत. दोन आश्चर्य दिल्लीत बसलेले आहेत. हे दहावं आश्चर्य हे महाराष्ट्रात आहे.”

फडणवीसांनी त्याचं वक्तव्ये पाहावं -संजय राऊत

संजय राऊत असंही म्हणाले की, “माणसानं किती खोटं बोलावं. मूळात मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेचा तुम्ही विश्वासघात केल्यामुळे… अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचं मान्य केलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी ब्लू सी मधील स्वतःचंच वक्तव्ये ते पाहावं. ते स्वतः काय बोलले? सत्तेचं वाटप 50-50 टक्के म्हणाले होते.”

Sharad Pawar: ‘फडणवीस सभ्य माणूस पण..’ पहाटेच्या शपथविधीवरुन पवारांनी सुनावलं

हे वाचलं का?

    follow whatsapp