‘चुंबन, भीती आणि ‘नाटू-नाटू’, संजय राऊतांची ‘रोखठोक’ टीका, कोणावर निशाणा?
Sanjay Raut Rokthok Column : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रोखठोकमध्ये विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी ‘चुंबन, भीती आणि ‘नाटू नाटु’ या मथळ्याखाली आजचा रोखठोक सदर लिहिला आहे. त्यांनी केंद्र आणि राज्यसरकारवर सडकून टीका केली. प्रामुख्याने शिंदेंवर त्यांचा जास्त रोख होता. त्यांनी लिहलंय, महाराष्ट्राचं सरकारही मोदींप्रमाणे (Narendra […]
ADVERTISEMENT
Sanjay Raut Rokthok Column : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रोखठोकमध्ये विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी ‘चुंबन, भीती आणि ‘नाटू नाटु’ या मथळ्याखाली आजचा रोखठोक सदर लिहिला आहे. त्यांनी केंद्र आणि राज्यसरकारवर सडकून टीका केली. प्रामुख्याने शिंदेंवर त्यांचा जास्त रोख होता. त्यांनी लिहलंय, महाराष्ट्राचं सरकारही मोदींप्रमाणे (Narendra Modi) बेकायदेशीर पद्धतीने राज्य चालवत आहेत. शिवसेनेच्या शाखांत पोलीस घुसवून शिंदे गटाचे लोक ताबा मिळवत आहेत. पोलीसी बळाचा वापर करून कार्यालयावर ताबा मिळवाल, पण जनभावना कशी विकत घ्याल? असा सवाल त्यांनी केला. (‘Kissing, Fear and ‘Natu-Natu’, Sanjay Raut’s ‘Rokhthok’ criticism, who is the target?)
चुंबन प्रकरणावर राऊतांचे सवाल
यासह रोखठोकमध्ये संजय राऊतांनी आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांच्या प्रकरणावर देखील सरकारला घेरलं. त्यांनी लिहलंय महाराष्ट्रात सध्या एका जाहीर चुंबनाचे प्रकरण सगळ्यांचेच मनोरंजन करीत आहे. शिंदेंच्या आमदाराने त्यांच्याच महिला पदाधिकाऱ्यांचे जाहीर चुंबन घेतले. त्याचे पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्र्याच्या उपस्थित हे चुंबन प्रकरण घडलं. शिवसेनेच्या तरुण कार्यकर्त्यांना घरात धाडी टाकून पकडण्यात आलं. मुळात चुंबन घेणं कायद्याने गुन्हा आहे का? नसेल तर मग शिवसैनिकांना अटक करण्याचे कारण काय?असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
शीतल म्हात्रेंच्या Viral व्हिडीओवर प्रकाश सुर्वेंनी सोडलं मौन, म्हणाले…
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
यावरच पुढे बोलताना राऊतांनी लिहलंय, संबंधित आमदार आणि महिलेला चुंबन प्रकारचा मनस्ताप झाला हे मान्य केले तरी, सार्वजनिक ठिकाणी केलेले साधे चुंबन अश्लील कृत्यात मोडते काय याचा खुलासा व्हावा व अटक केलेल्या शिवसैनिकांची सुटका व्हावी, अशी मागणी राऊतांनी रोखठोकमध्ये केलीय. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी फडणवीस यांच्याबरोबर सरळ लव्ह जिहादचाच प्रकार केला व उघडपणे अनैतिक पद्धतीने एकत्र राहत आहे, यास काय म्हणावे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
भीतीचं राज्य
भीतीच्या राज्यात लोकशाही टिकेल का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. ते म्हणाले, अदाणी प्रकरण, एलआयसी, बँकेची लूट यावर भाजपच्या नेत्यांनी तोंडाला टाळे लावले. यावर भाजपचा एकही सत्यवादी नेता बोलायला तयार नाही. राहुल गांधींनी देशातील लोकशाही धोक्यात असल्याचे लंडन येथे भाष्य केले, ते भाजपला आवडले नाही. त्यांनी राहुल गांधींच्या माफीची मागणी संसदेत केली. पण अदाणी प्रकरणाच्या लुटीवर ते गप्प आहेत. कारण मोदींचे भय त्यांना वाटते. भीतीच्या राज्यात लोकशाही टिकेल का? चित्र भयावह आहे. असं त्यांनी म्हटलंय.
ADVERTISEMENT
शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरण : पुण्यातील एका तरुणाला अटक
ADVERTISEMENT
‘नाटू-नाटू’चं श्रेय
RRR चित्रपटही ‘नाटू-नाटू’ या गाण्याला ऑस्करच्या सन्मान प्राप्त झाला. राज्यसभेत त्यावर अभिनंदनपर भाषणं झाली. विरोधीपक्ष नेते मालिकार्जून खर्गे म्हणाले आता या ऑस्करचे श्रेय मोदी यांनी घेऊ नये. कारण RRR चित्रपटाचे पटकथा लेख विजयेंद्र प्रसाद यांना भाजपने राज्यसभेत पाठवले आहे. खर्गे म्हणले तसंच झालं. खासदार पियुष गोयल अगदी तसंच बोलले. मोदी श्वास घेतात म्हणून जग चालत आहे, एवढेच सांगायचे बाकी आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
केंद्र सरकारवर टीका
सरकारकडून ईडीचा वापर करून विरोधकांचा तोंड दाबायचा प्रयत्न सुरूय. लालू यादव यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर मी शेवट्पर्यंत लढत राहीन पण शरण येणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. दुसरीकडे तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या मुलीला ईडीचं समन्स आलं पण त्या देखील गुडघे टेकणार नाही, स्पष्टच सांगितलं. हे राजकारण मोदी-शहा यांच्या अवतीभवती फिरत आहे, असं सामनात लिहलंय.
विरोधी पक्षांवर सुद्धा सामनामधून टीका केली.
यासह त्यांनी भाजपच्या व्यतिरिक्त विरोधी पक्षांवर सुद्धा सामनामधून टीका केली. त्यांनी लिहलंय या सगळ्याच्या विरोधात विरोधक लढण्याच्या मूडमध्ये आहेतच, पण विरोधकांत अद्यापही एकीचे दर्शन घडत नाही. हेच मोदी आणि शहांचे बलस्थान आहे. ईडीसारख्या संस्था कायद्याचा गैरवापर करून विरोधकांना जेरीस आणतात. त्याविरुद्ध सर्व खासदारांनी एकत्र येऊन ईडीच्या कार्यालयावर मोर्चा काढावा, असं संजय राऊत म्हणतात.
पुढे लिहलंय की, गौतम अदाणी यांनी केलेल्या लुटमारीची तक्रार ईडीच्या संचालकांकडे करावी, असं ठरलं. पण त्या तक्रारीवर ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादीने साह्य केल्या नाहीत. ईडीवरील मोर्चातही हे पक्ष सामील नव्हते. याउलट तृणमूल आणि राष्ट्रवादीदेखील ईडीच्या वरवंट्याखाली भरडून निघाली आहे, असं संजय राऊत यांनी सामनामध्ये लिहलंय.
Adani-Hindenberg प्रकरणाचा तपास करणारे ‘ते’ तज्ज्ञ कोण?
ADVERTISEMENT