महामोर्चा: ‘मुका मोर्चा म्हणणारे आता..’, फडणवीस जेव्हा राऊतांना पडतात भारी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Devendra Fadnavis criticism Sanjay Raut: नागपूर: महाविकास आघाडीने जो हल्लाबोल मोर्चा काढला होता. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नॅनो मोर्चा म्हणत विरोधकांवर बोचरी टीका केली होती. ज्याला उत्तर देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. पण हा व्हिडीओ हल्लाबोल मोर्चाचा नसून तो मराठा समाजाचा असल्याचा दावा अनेक जण करत आहेत. त्याचवरुन आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांना खडे बोल सुनावले आहेत. ते नागपूरमध्ये बोलत होते.

ADVERTISEMENT

‘एक तर मराठा मोर्चा कोणत्या पक्षाचा नव्हता तो मराठा समाजाचा होता. त्या मोर्चाला हीच मंडळी होती. ज्यांनी मूक मोर्चाचं मुका मोर्चा म्हणून अतिशय बीभत्स अशा प्रकारे त्यावर आपलं मत व्यक्त केलं, आपल्या पेपरमध्ये छापलं आणि आता पुन्हा तेच लोकं त्याचा व्हिडीओ ट्वीट करतात. मग नंतर मुजोरी करतात की, एमव्हीएने तो मोर्चा काढला होता.’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी त्या व्हिडीओवरुन राऊतांना बरंच काही सुनावलं आहे.

‘महामोर्चा’ ऐवजी मराठा मोर्चाचा व्हिडीओ? संजय राऊत ट्रोल; संभाजीराजेंनीही केली कानउघडणी

हे वाचलं का?

पाहा देवेंद्र फडवणीस नेमकं काय म्हणाले:

‘विरोधी पक्ष आपलं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न करतंय. त्यांचा मोर्चा नॅनो मोर्चा ठरल्यामुळे ते याठिकाणी कुठे तरी मला असं वाटतंय की, आत्मचिंतन करतायेत. आपलं अस्तित्व मोठ्या प्रमाणात मीडियाच्या माध्यमातून गेलं पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे.’

ADVERTISEMENT

‘हा मोर्चा मी नॅनो मोर्चा म्हटलं तर त्यावर शिक्कामोर्तबच काल एकप्रकारे मराठा मोर्चाचा व्हिडीओ हा त्या मोर्चाचा दाखवून संजय राऊतांनी ट्विट केला. त्यातूनच लक्षात येतंय की, त्यांचा मोर्चा हा नॅनो होता. थोडा मानसिक परिणाम झाला आहे.’

ADVERTISEMENT

‘एक तर मराठा मोर्चा कोणत्या पक्षाचा नव्हता तो मराठा समाजाचा होता. त्या मोर्चाला हीच मंडळी होती. ज्यांनी मूक मोर्चाचं मुका मोर्चा म्हणून अतिशय बीभत्स अशा प्रकारे त्यावर आपलं मत व्यक्त केलं, आपल्या पेपरमध्ये छापलं आणि आता पुन्हा तेच लोकं त्याचा व्हिडीओ ट्वीट करतात. मग नंतर मुजोरी करतात की, एमव्हीएने तो मोर्चा काढला होता. आम्ही त्यात होतो… त्यामुळे मराठा समाज हे सहन करणार नाही. कोणीही त्याचा तसा वापर करु नये.’

‘आमचा कोणासोबतही सामना नाहीए. आणि आम्ही सामना वाचतही नाही त्यामुळे सामनाबाबत आम्हाला काहीही माहिती नाही.’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली आहे.

महामोर्चा: ‘..तर त्यांचा पुढचा कार्यक्रम आपण एकत्र बसून करु’, पवारांचं खुलं आव्हान

‘मोदींच्या सरकारमध्ये सीबीआय आणि ईडीचा कधीही दुरुपयोग झाला नाही’

‘सीबीआय आणि ईडीचा दुरुपयोग हा सर्वाधिक त्यांच्या सरकारच्या काळात झाला आहे. ती लोकं सीबीआयवर कशाप्रकारे कब्जा करायचे आणि कसं काम करायचे हे सगळ्यांनी पाहिलं आहे. मोदीजींच्या सरकारमध्ये कधीही सीबीआय आणि ईडीचा दुरुपयोग झालेला नाही. लोकपाल, लोकायुक्त हे कायदे आम्ही एवढे स्वतंत्रपणे तयार केले आहेत की, यामध्ये कोणालाही दुरुपयोग करण्याची संधीच मिळणार नाही.’ असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT