Sidhu Moose Wala वर गोळ्या झाडणाऱ्या पुण्यातल्या संतोष जाधवची आई म्हणते……
स्मिता शिंदे, प्रतिनिधी, सांगली पंजाबी गायक सिद्धू मुसेवालावर गोळ्या झाडणाऱ्या आणि त्याची हत्या करणाऱ्या शार्प शूटर्सची ओळख पटली आहे. यापैकी दोन शूटर्स पुण्यातले आहेत. संतोष जाधव आणि सौरव महाकाळ अशी या दोघांची नावं आहेत. दोन्ही आरोपी हे पुणे जिल्ह्यातले आहेत त्यातला संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील मंचरचा आहे. मुझे भाई बनना है…. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव […]
ADVERTISEMENT

स्मिता शिंदे, प्रतिनिधी, सांगली
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालावर गोळ्या झाडणाऱ्या आणि त्याची हत्या करणाऱ्या शार्प शूटर्सची ओळख पटली आहे. यापैकी दोन शूटर्स पुण्यातले आहेत. संतोष जाधव आणि सौरव महाकाळ अशी या दोघांची नावं आहेत. दोन्ही आरोपी हे पुणे जिल्ह्यातले आहेत त्यातला संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील मंचरचा आहे.
मुझे भाई बनना है….
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील पोखरी गावच्या पंढरीनाथ विद्यालयात नववी इयत्तेतून शाळा सोडलेला संतोष जाधव पुढे अशा पद्धतीने क्रिमिनल होईल अस कुणालाही स्वप्नातही वाटलं नव्हतं. मात्र वडिलांचे अकाली निधन झाले आणि पुढे मित्रांच्या संगतीने संतोष जाधव वाईट नादाला लागला.”मुझे भाई बनना है” हा वास्तव चित्रपटातला डायलॉग तो नेहमी म्हणत असे.अस तो त्याच्या काही मित्रांसोबत नेहमी बोलत असे.