वाई हत्याकांड : संतोष पोळने माझ्यासमोर तीन खून केले, ज्योती मांढरेची न्यायालयात साक्ष
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सातारा जिल्ह्यातील वाई हत्याकांडात माफीची साक्षीदार झालेल्या ज्योती मांढरेने गुरुवारी सातारा जिल्हा न्यायालयात महत्वाची साक्ष दिली आहे. संतोष पोळनेच माझ्यासमोर तीन खून केल्याची साक्ष ज्योती मांढरेने दिली असून आपलं पोळ याच्यासोबत मंदिरात लग्न झाल्याचंही ज्योती मांढरेने सांगितलं आहे. २०१६ साली तथाकथित डॉक्टर संतोष पोळने वाई (धोम) येथे केलेलं हत्याकांड उघडकीस आलं […]
ADVERTISEMENT

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सातारा जिल्ह्यातील वाई हत्याकांडात माफीची साक्षीदार झालेल्या ज्योती मांढरेने गुरुवारी सातारा जिल्हा न्यायालयात महत्वाची साक्ष दिली आहे. संतोष पोळनेच माझ्यासमोर तीन खून केल्याची साक्ष ज्योती मांढरेने दिली असून आपलं पोळ याच्यासोबत मंदिरात लग्न झाल्याचंही ज्योती मांढरेने सांगितलं आहे.
२०१६ साली तथाकथित डॉक्टर संतोष पोळने वाई (धोम) येथे केलेलं हत्याकांड उघडकीस आलं होतं. एकामागोमाग एक सहा खूनांचा उलगडा झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि पोलीस यंत्रणा हादरली होती. या प्रकरणात संतोष पोळची साथीदार असलेली ज्योती मांढरे आता माफीची साक्षीदार बनली आहे.
या हत्याकांडाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश एन.एल.मोरे यांच्यासमोर सुरु आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम सरकार पक्षातर्फे काम पाहत असून गुरुवारी ते न्यायालयात उपस्थित होते.वाई हत्याकांड प्रकरणात अनेक घडामोडीनंतर गुरुवारी या खटल्यातील महत्वाची माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिच्या साक्षीला सुरवात झाली. साक्ष देताना ज्योती म्हणाली, वाई येथील डॉ. घोटवडेकर यांच्या दवाखान्यात मी काम करत असताना २०१३ मध्ये तिची संतोष पोळ याच्याशी ओळख झाली.