सुकेश चंद्रशेखरकडून चॉकलेट्स, घड्याळं गिफ्ट! आता सारा अली खान ईडीच्या रडारवर
जॅकलिन फर्नांडीस आणि सुकेश चंद्रशेखर यांच्यातलं अफेअर, त्याने तिला दिलेली गिफ्ट. त्यांचे काही फोटो हे सगळं व्हायरल होत असतानाच आता सारा अली खानही ईडीच्या रडारवर आहे. कारण खंडणीखोर सुकेश चंद्रशेखरने सारा अली खानला गिफ्ट दिल्याचं समोर येतं आहे. चॉकलेट्स आणि काही महागडी घड्याळं दिल्याचं समोर येतं आहे. त्यामुळे अभिनेत्री सारा अली खान ईडीच्या रडारवर आहे. […]
ADVERTISEMENT

जॅकलिन फर्नांडीस आणि सुकेश चंद्रशेखर यांच्यातलं अफेअर, त्याने तिला दिलेली गिफ्ट. त्यांचे काही फोटो हे सगळं व्हायरल होत असतानाच आता सारा अली खानही ईडीच्या रडारवर आहे. कारण खंडणीखोर सुकेश चंद्रशेखरने सारा अली खानला गिफ्ट दिल्याचं समोर येतं आहे. चॉकलेट्स आणि काही महागडी घड्याळं दिल्याचं समोर येतं आहे. त्यामुळे अभिनेत्री सारा अली खान ईडीच्या रडारवर आहे.
सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन यांच्यातली जवळीक दाखवणारा ‘हा’ फोटो तुफान व्हायरल
सारा अली खानसोबत मैत्री करण्याच्या उद्देशाने चॉकलेट्स आणि फ्रँक मुलर घड्याळं देण्यात आली होती अशी माहिती इंडिया टुडेच्या सूत्रांनी दिली आहे. याआधीच्या तपासात हे समोर आलं होतं की सुकेश चंद्रशेखरने कॅनेडियन वंशाची अभिनेत्री नोरा फतेहीला BMW कार गिफ्ट केली होती. तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसला त्याने दहा कोटींहून अधिक किंमतीच्या वस्तू भेट दिल्या होत्या. त्यामुळे जॅकलिन आणि त्याचं प्रकरण गाजलं होतंच आता या सोबतच सारा अली खानचंही नाव समोर आलं आहे.