खळबळजनक! साताऱ्यातील पेढेवाल्या मोदींना बाँम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबई तक

–इम्तियाज मुजावर, सातारा सातार्‍यातील मिठाई व्यावसायिकाला गेल्या 8 दिवसांपासून बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आंतरराष्टीय नंबरवरून कॉल येत असून, 30 लाखांच्या खंडणीची मागणी केली जात आहे. पैसे न दिल्यास बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या याप्रकरणी पोलीस मुख्यालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यातील पेढे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

इम्तियाज मुजावर, सातारा

सातार्‍यातील मिठाई व्यावसायिकाला गेल्या 8 दिवसांपासून बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आंतरराष्टीय नंबरवरून कॉल येत असून, 30 लाखांच्या खंडणीची मागणी केली जात आहे. पैसे न दिल्यास बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या याप्रकरणी पोलीस मुख्यालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

साताऱ्यातील पेढे व्यवसायिक प्रशांत मोदी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मागील आठ दिवसांपासून त्यांना इंटरनॅशनल कॉल येत आहेत. ’30 लाख रुपये दे, अन्यथा बॉम्ब लावून उडवून देईन’, अशी धमकी देणारे मेसेज त्यांना पाठवण्यात आले आहेत.

सातारा जिल्हा बँक निवडणूक : चार राजे बिनविरोध, पण माजी पालकमंत्र्यांसमोर विजयाचं मोठं आव्हान

सुरुवातीला मोदी यांनी या मेसेजकडे दुर्लक्ष केले. मात्र, नंतर रात्री-अपरात्री देखील त्यांना फोन आणि मेसेज येऊ लागले. वारंवार 30 लाख रुपयांसाठी धमकावलं जाऊ लागलं. सुमारे 10 ते 12 कॉल, मेसेज आल्याने मोदी यांनी पोलीस मुख्यालयात याबाबत ई-मेल करुन तक्रार अर्ज पाठवला आहे.

या तक्रार अर्जात आलेले फोन नंबर, मेसेज याचे स्क्रीन शॉट देखील जोडण्यात आले आहेत. तक्रार अर्जात म्हटले आहे की, येणार्‍या या धमक्यांमुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. दोन नंबर वरुन एकाच प्रकारची धमकी दिली जात असल्याचा उल्लेखही तक्रार अर्जात करण्यात आलेला आहे.

ST Strike : एसटी कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराने मृत्यू; आठ दिवसांपासून होते तणावाखाली

सातारा पोलिसांना मेल पाठवल्यानंतर मंगळवारी प्रशांत मोदी यांनी सायबर पोलीस ठाण्यात जावून घडलेल्या घटनेची माहिती दिली. सातारा पोलिसांनी सर्व माहिती घेवून तपासाला सुरुवात केली असून, सर्वच बाजूंनी या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. साताऱ्यातील व्यावसायिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp